October 2, 2024
पायी चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!

पायी चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!

पायी चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!

चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जातो।

अनेकजण सांगतात की, पायी चालल्याचे अनेक फायदे आहेत. अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते. इटलीच्या युनिव्हर्सिटी ऑफ फरेराच्या संशोधकर्त्यांनुसार, वेगात चालण्याने रुग्णालयात अॅडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते.

या अभ्यासात 1,078 हाय ब्लड प्रेशर ग्रस्त लोकांना सहभागी करुन घेतले होते. हळू चालणा-यांच्या तुलनेत वेगाने चालणा-यांची तीन वर्षात रुग्णालयात अॅडमिट होण्याची 37 टक्के शक्यता कमी आढळली आहे. शोधकर्ते म्हणाले की, चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो.

वेगाने चालण्याचे फायदे –

अमेरिकन जर्नल ऑफ सायन्समध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार चालण्याचे तुम्हाला खालील फायदे होतात.

1) आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते.
2) रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते.
3) रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.
4) दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते.
5) रोज कमीत कमी 1 तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो.
6) सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.
7) हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.
8) चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
9) सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
10) चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत
11) चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
12) मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
13) वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम
14) चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
15) चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
16) दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलंय.
17) चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.
18) झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो.
19) नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
20) नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
21) नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
22) नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
23) हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
24) नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात.
25) मोतीबिंदूची शक्यता कमी होते.
26) नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो.
27) नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग.
28) चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
29) दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
30) नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.

🌹🌹🌺🌺🌺🙏🙏🙏

माहिती आवडल्यास ईतरांशी शेअर करा 📲 आणि आरोग्य विषयक नवनवीन माहिती साठी ग्रुप जॉइन करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *