October 2, 2024
केस गळती होतेय ? हे ' 7' घरगुती उपाय नक्की करुन पहा.

केस गळती होतेय ? हे ‘ 7’ घरगुती उपाय नक्की करुन पहा.

केस गळती होतेय ? हे ‘ 7’ घरगुती उपाय नक्की करुन पहा.

स्त्रीचे खरं सौंदर्य तीच्या केसांमध्ये असते , मग केसगळती रोखा या काही घरगुती उपायांनी !

काही जण प्रदूषणामुळे, कोंड्यामुळे तर काही तणावपूर्ण जीवनशैलीमुळे केसगळतीच्या समस्येशी झगडत असतात. तज्ञांच्या मते, काही प्रमाणात होणारी केसगळती ठीक आहे मात्र जेव्हा ती दिवसाला ५० – १०० केसांच्या वर जाते तेव्हा मात्र धोक्याची घंटा आहे.

अशावेळी हे काही घरगुती उपाय करून तर पहा…

१) कांद्याचा रस :-


कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते.

कसे कराल ?

  • एक कांदा बारीक कापून त्याचा रस काढा.
  • रस टाळूवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा.
  • सौम्य शाम्पूने केस धुवा व ते वाऱ्यावर सुकू द्या.
  • आठवड्यातून दोनदा हा उपचार करून पहा.

२) लसुण :-


कांद्याप्रमाणेच लसूण मध्येही ‘सल्फर’चे घटक असतात म्हणूनच पारंपारिक केस वाढीच्या औषधांमध्ये याचा वापर केल्याचे प्रामुख्याने आढळून येते .

कसे कराल ?

  • लसणाच्या काही पाकळ्या ठेचून घ्या.
  • त्यात खोबऱ्याचे तेल घालून मिश्रण गरम करून घ्या.
  • मिश्रण थोडे थंड झाल्यावर
    केसांच्या मुळांशी लावा.
  • ३० मिनिटे तेल लावून ठेवा त्यानंतर केस धुऊन टाका.
  • असे आठवड्यातून दोनदा करा.

३) नारळ :-


केसांच्या वाढीसाठी तसेच त्याच्या देखभालीसाठी नारळ अतिशय उपयुक्त आहे. नाराळातील उपयुक्त मेद, प्रोटिन्स व मिनरल्स केसांचे तुटण्याचे प्रमाण कमी करते. केस गळती रोखण्यासाठी नारळाचे दुध वा तेल अतिशय उपयुक्त ठरते.

कसे कराल ?

  • नाराळाचे तेल गरम करून घ्या व केसाच्या मूळापासून टोकापर्यंत लावा.
  • तासाभराने केस धुऊन टाका.
  • किंवा खोबरं किसून त्याचे दुध काढून ते टाळूवर केस गळतीच्या जागेवर लावा.
  • रात्रभर ते राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुऊन टाका.

४) हीना :-


केसांना नैसर्गिक रंग देण्याच्या प्रक्रियेत हीना प्रामुख्याने वापरला जातो मात्र मूळापासून केस घट्ट करण्याची क्षमतासुद्धा हीनात आहे.

कसे कराल ?

  • २५० ग्रॅम राईच्या तेलात ६० ग्रॅम धूतलेली हिनाची पाने घाला.
  • हे मिश्रण उकळून नंतर गाळून घ्या.
  • आवश्यक तेवढ्या तेलाने टाळूवर मसाज करा व उर्वरित हवाबंद डब्यात ठेवा.
  • सुकी हिना पावडर दह्यात मिसळून तासभर केसांना लावून ठेवा तासाभराने केस धुऊ न टाका.

अन्य घरगुती हीना पॅक्स बनवण्यासाठी – (‘हीना’ – केसगळती दुर करणारा रामबाण घरगुती उपाय) नक्की पहा.

५) जास्वंद :-


जास्वंद केसांना पोषण देतात, केसगळती टाळतात तसेच केस अकाली पांढरे होण्यापासून बचावतात.

कसे कराल ?

  • काही जास्वंदाची फुले कुटून तीळ अथवा खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र करा.
  • हे मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा.
  • थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा .

केसगळती रोखण्यासाठी तुम्ही घरच्या घरीच देखील बनवू शकता हे जास्वंदाचे हेअर पॅक्स.

६) आवळा :-


केस गळतीने त्रस्त असलेल्यांसाठी ‘आवळा’ नक्कीच फायदेशीर ठरतो, त्यातील व्हिटामिन सी व अँटी ऑक्सिडन्ट गुण सुरवातीच्या टप्प्यातील केसगळती थांबवते.
कसे कराल ?

  • आवळ्याचा अर्क अथवा पावडर लिंबाच्या रसात एकत्र करा.
  • हे मिश्रण केसांना लावून सुकू द्या.
  • केस कोमट पाण्याने धुऊन टाका.

७) अंड


अंड्यातील अनेक घटक केस गळतीवर किफायतशीर आहेत. त्यातील सल्फर, फॉसफरस , आयोडीन, झिंक घटक केसांच्या वाढीस मदत करतात.

कसे कराल ?

  • एका अंड्यातील पांढरा भाग एक टीस्पून ऑलिव तेलात मिक्स करा हे मिश्रण फेटून केसांना लावून ठेवा.
  • १५ ते २० मिनिटांनंतर थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा.
    माहिती आवडल्यास ईतरांशी शेअर करा 📲 आणि आरोग्य विषयक नवनवीन माहिती साठी ग्रुप जॉइन करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *