October 2, 2024

दुधीभोपळा….

दुधीभोपळा….

.. दुधी भोपळा म्हटले की अनेक जण नाके मुरडतात, मात्र तो किती गुणकारी आहे याबद्दल आपण जाणून घेऊ या…तर बघू या याचे फायदे…👇

 ह्रुदयविकाराच्या रुग्णांना दुधि भोपळ्याचा रस सकाळ संध्याकाळ एक-एक वाटिदिल्यास नसांमधले कोलेस्टेरॉल कमी होते., दुधीचा रस एक वाटि लिंबाचा रस एक चमचा व एक चमचा मध एकत्र करून दिल्यास सर्व प्रकारचे मूत्रविकार बरे होतात.भोपळ्याच्या रसात पाणी भरपूर असल्याने ते शरिर थंड ठेवतो., युरिन वारंवार होणे जळजळ होणे हे सर्व त्रास दूर होतात...
 दूधी भोपळा हा केसांवर हि गुणकारी आहे. केस पांढरे होणे, व गळणं या समस्येसाठी रस काढून घ्यावा. या रसात तिळाचे तेल मिसळून केसांचि मालिश करावी.रोज दुधी भोपळ्याचा रस घेतल्यास पचनसंस्था निरोगी राहते.पोटाचे आजार होत नाही..
 वजन कमी करण्यासाठी संध्याकाळी दुधी भोपळ्याचे सूप प्यावे. ताप उतरत नसेल तर दुधी भोपळ्याचा किस कपाळावर लावा.ताप कमी होईल.दूधी भोपळ्याचे तेल डोके दुखल्यास लावावे आराम मिळतो. आणि रस मधात मिसळून घ्यावा.लहान मुलांना कायम दूधी भोपळा खाऊ घाला. याने
  बुद्धि तल्लख होते,

क चमचा आवळा चूर्ण भोपळ्याचा रसात रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास शांत झोप लागते.दूधिभोपळ्याचा रस आटवून त्यात एक मिरा व पिंपळी वाटून, त्यात एक चमचा मध मिसळून त्याचे चाटण लहान मुलांना दिल्यास छातितिल कफ सुटतो.रोज सकाळी अनशापोटी अर्धा वाटी दुधी भोपळ्याचा रस व एक चमचा आल्याचा रस पाण्यात मिसळून घेतल्यास स्थुलपणा कमी होतो.
दुधी भोपळ्याच्या एक वाटी रसात एक चमचा मध व चिमूटभर जायफळ पूड घालून तयार झालेला लेप त्वचेवर लावल्यास चेहरा उजळतो व सुंदर होतों..
मधुमेहावर फायदेशीर .हा रक्तातील ग्लुकोज कमी करण्यासाठी मदत करतो. याशिवाय दूधी भोपळा इन्सुलिन वाढविण्यासाठी मदत करतो.दूधी भोपळ्यातिल फायबर बद्धकोष्ठता व मुळव्याध दूर करतो..दूधिभोपळ्यामध्ये कमी कॅलरीज असल्याने तो ह्रुदयरोगांसाठी एक वरदानच ठरला आहे.
रोज सकाळी अर्धा कप दूधी भोपळ्याचा रस, तुळशीची ७-८ पाने, पुदिन्याची ७-८ पाने, जिरे, काळि मिरे एकत्र करून रोज सकाळी हा रस प्यावा यामुळे रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होतो.
आणि रक्तपुरवठा सुरळीत होतो.

अति उष्णता, जूलाब, आम्लपित्त, मधुमेह, अती तेलकट पदार्थ खाल्ल्याने जर वारंवार तहान लागत असेल तर अशा वेळी ग्लासभर दूधिचा रस चिमुटभर मीठ घालून त्याच सेवन करावे.यामुळे घामावाटे शरिराबाहेर जाणारे क्षार कमी होतात. तहान लागणं कमी होते. व थकवा ही जाणवत नाही.
अति उष्णतेने डोळ्यांचि आग होत असल्यास, डोळ्यांचि लालि वाढली असेलतर दूधीचा किस कापसावर ठेवून तो डोळ्यांवर ठेवा. व शांतपणे पडून राहा. यामुळे डोळ्यांचि उष्णता कमी होते.
दूधी चे बी औषध म्हणून उपयुक्त आहे. जर या बीया दूधामध्ये वाटून घेतल्या तर मेंदुचि कार्यक्षमता वाढुन विस्मरण कमी होते.तळपायांना भेगा पडल्या असतील तर अशा वेळी दूधिने सिद्ध केलेले तेल तळपायाला लावून पायात मोजे घालावेत. याने उष्णता कमी होते व भेगा भरून येतात..

तेव्हा अशा प्रकारे हि अतिशय उपयुक्त व पौष्टिक भाजि आहे. किमान आठवड्यातून एकदा अवश्य खावि…

☘️☘️🌹🌹🌹☘️☘️🙏

*माहिती आवडल्यास ईतरांशी 📲 शेअर करा .

Swati borse
Vadodara Gujarat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *