तुमच्याही पायांच्या नसा निळ्या- हिरव्या किंवा फुगीर दिसतात का?
तुमच्या पायातील रक्तवाहिन्या 🩸 या अगदी बारीक तंतूप्रमाणे आणि अगदी वाकड्या तिकड्या दिसत असतील तर हे लक्षण वेळीच ओळखायला हवे. पायातील नसा सुजल्याने अनेकांना प्रचंड वेदना 😖 जाणवतात, तर काहींना अगदी नेहमीची कामे सुद्धा करणे अशक्य होऊन बसते. वैद्यकीय भाषेत या लक्षणांना व्हेरिकोज व्हेन्स असे म्हंटले जाते, यामध्ये नसांच्या आजूबाजूच्या त्वचेचा 🫳🏻रंग बदलणे, बराच वेळ बसून किंवा उभे राहिल्याने तीव्र वेदना होणे असेही त्रास जाणवतात.
![](https://articles.contentstudioo.com/wp-content/uploads/2024/05/Screenshot-2024-05-13-215735.png)
व्हेरिकोज व्हेन्स वरील उपचारासाठी आपल्याला गोळ्या औषधांचा मारा करण्याची गरज नाही. उलट काही सोप्या आयुर्वेदिक उपचारांनीही आपण आराम 👍🏻 मिळवू शकता. रक्तवाहिन्या शुद्ध राहाव्यात व व्हेरिकोज मुळे होणारी जळजळ किंवा वेदना कमी होण्यासाठी खालील उपाय आपणही करून पाहू शकता..
▪️जास्त वेळ उभे 🪑 किंवा बसू नका
. ब्रेक घ्या. आपल्या पायाच्या बोटांवर उभे राहणे आणि चालणे 🚶🏻♂️ उपयुक्त ठरू शकते.
![](https://articles.contentstudioo.com/wp-content/uploads/2024/05/Screenshot-2024-05-13-220040.png)
▪️तुम्ही बसलेले असताना पाय वर करा.
आपण डोक्याखाली उशी घेण्याऐवजी पायाखाली ठेवू शकता किंवा भिंतीला लागून बेड असल्यास भिंतीच्या आधारे पाय टेकवून ठेवू शकता. यामुळे रक्तवाहिन्यांना रक्ताभिसरणात मदत होईल.
▪️अँटी-
इन्फ्लेमेंटरी तेलाने पायाला मसाज करावा, यासाठी मध्यम दाब ठेवा व खालून वर अशा दिशेत मालिश करा.
▪️योगासन:
विशेषत: शीर्षासन, मेरुदांडासन, पदौत्तानासन, सर्वांगासन, नौकासन अशी आसने करणे फायदेशीर आहे. यामुळे पायात रक्त साचून राहिले असल्यास ते वाहते होण्यास मदत होते.
![](https://articles.contentstudioo.com/wp-content/uploads/2024/05/Screenshot-2024-05-13-220244.png)
▪️नियमित व्यायाम करा पण अतिरेक करू नका.
अशुद्ध रक्तामुळे त्रास उद्भवत असल्यास केवळ व्यायाम नव्हे तर आहारात 🥗 सुधार करणेही गरजेचे आहे. आपल्याला घरगुती उपायांनी आराम मिळत नसल्यास आयुर्वेदिक उपचार घेण्याचा विचार करू शकता. मात्र त्रास वाढेपर्यंत किंवा रक्तस्त्राव🩸 होईपर्यंत थांबू नका, वेळेवर उपचार न केल्यास यावर शस्त्रक्रियेशिवाय उपाय उरत नाही त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
*माहिती आवडल्यास आपल्या पर्यंत सिमित न ठेवता ईतर ग्रुपवर शेअर करा 📲 आणि तुमचे अभिप्राय कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा
स्वाती बोरसे
Vadodara Gujarat
“Start Your Website Journey Today – Exclusive Hostinger Discounts!”
![](https://articles.contentstudioo.com/wp-content/uploads/2024/11/Screenshot-2024-08-25-204607-1024x357.png)
![](https://articles.contentstudioo.com/wp-content/uploads/2024/12/Screenshot-2024-09-22-123030-1024x486.png)
![](https://articles.contentstudioo.com/wp-content/uploads/2024/12/Screenshot-2024-09-14-194517-1-1536x684-1-1024x456.png)
![](https://articles.contentstudioo.com/wp-content/uploads/2024/12/Screenshot-2024-09-14-201205-1024x284.png)