लेमन टी पिण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे,
कसा बनवायचा पर्फेक्ट लिंबाचा चहा
एका स्वच्छ पातेल्यात पाणी घेऊन त्याला उकळी आणा.
रंग येण्यासाठी यात चहापूड घाला. लक्षात ठेवा की चहापूड खूप कमी घालायची आहे.
याला एक उकळी आणून कपात गाऴून घ्या.
या कपात वरून लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. (कोमट असताना)
चव वाढवण्यासाठी आपल्या आवडीनुसार यात आपण मध (कोमट असताना) आणि आलेही घालू शकता.
आपला लिंबाचा चहा तयार आहे.
लेमन टी पिण्याचे अनेक आरोग्यदाचे फायदे :-
आपल्याला माहित आहेतच की लिंबाचा चहा चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर असतो. पण कसा? लिंबू शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि मेटाबोलिजम वाढवण्यास मदत करते.
लिंबू हा विटामिन सीचा प्रमुख स्रोत आहे. यामुळे शरीरातील पेशींची वाढ आणि विकास होण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही मदत होते. विटामिन सी लोहाची कमतरता रोखते आणि रक्तदाब व हृदयरोगाचा धोका कमी करते.
लिंबाच्या चहात आले घातल्यास हे पेय सूज रोखण्यासाठी उपयुक्त असते. आले हा मळमळ व अंगदुखीवरचा उत्तम उपाय आहे. याशिवाय वारंवार भूक लागण्याच्या तक्रारीवरही गुणकारी असते. आल्यातील उच्च फायबरमुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि पचनास मदत होते.
लिंबाचा चहा जास्त आरोग्यकारक बनवण्यासाठी यात साखर घालू नका. याऐवजी मध वापरा. यातील नैसर्गिक गोडवा मेटाबोलिजम वाढवतो आणि चरबी कमी करतो.
आपल्या आवडीनुसार यात आपण चहा करताना कार्बनिक लेमनग्रास घालू शकता. यात अँटीऑक्सिडंट गुण असतात आणि हे त्वचा व केसांसाठी चांगले असते. यामुळे मासिक पाळीच्या वेदनांपासूनही आराम मिळतो.
माहिती आवडल्यास आपल्या पर्यंत सिमित न ठेवता ईतर ग्रुपवर शेअर करा 📲 आणि तुमचे अभिप्राय कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा.
स्वाती बोरसे
Vadodara Gujarat
Very informative, thx for sharing and looking for more and more such informative and useful post.
thank you plz share in your friends and relatives