केसांमध्ये कोंडा झाला आहे मग करा हे घरगुती उपाय.
▪️ मेथीची पूड पाण्यात घालून लेप तयार करावा, आणि सबंध डोक्यावर लावावा. एक तासानंतर डोके धुवून टाकावे.
▪️ केस धुताना वारंवार लिंबाचा रस वापरल्यास कोंडा कमी होण्यास फायदा होतो.
▪️ दोन-तीन दिवसाचे शिळे (आबंट दही), थोडासा लिंबाचा रस, व्हिनिगर आणि आवळ्याचा रस यांच्या वापरानेही कोंडा कमी होऊ शकतो.
▪️ मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट करून घ्या. मग तुम्ही ही पेस्ट आणि दही एकत्र करून स्काल्प आणि केसांच्या मुळापर्यंत लावा. त्याचबरोबर मसाज देखील करा. मग 30 मिनिटाने केस धुऊन घ्या.
▪️ १०० मिली नारळाच्या तेलात लिंबाच्या बियांचे चूर्ण(20 ग्रॅम) चांगल्याप्रकारे मिसळून घ्या. आठवड्यातून दोन दिवस रात्री या तेलाने मालिश केल्यास डँड्रफची समस्या दूर होऊ शकते.
▪️ काळी माती केसांसाठी चांगली असते. काळी माती दोन तास पाण्यात कालवून ठेवा. नंतर डोक्यास ही माती लावा आणि थोड्या वेळाने डोके धुऊन घ्या कोंडयाची समस्या दूर व्हायला मदत होईल.
▪️ केसातला कोंडा कमी करण्यासाठी दही + अंडं + लिंबू + बेसन यांचं मिश्रण हा एक उत्तम लेप सिद्ध झाला आहे. सुकी त्वचा ही अल्कालाइन आहे, त्यावर हा लेप आम्ल क्रिया करतो आणि त्वचेला समतोल ठेवतो.
▪️ त्रिफळा पावडर दह्यात भिजवून त्याचा लेपही एक उत्तम औषध म्हणून वापरण्यास काहीच हरकत नाही.
माहिती आवडल्यास आपल्या पर्यंत सिमित न ठेवता ईतर ग्रुपवर शेअर करा 📲 आणि तुमचे अभिप्राय कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा
स्वाती बोरसे
Vadodara Gujarat