December 30, 2024

हाताची पाचही बोटे त्यांचे आरोग्यदायी फायदे

जर तुम्ही रोज फक्त १ मिनिटं ह्या बोटांना दाबल्यास तुम्हाला ह्याचा काय फायदा होतो हे माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हांला ह्याचे फायदे सांगणार आहोत……

ही गोष्ट कदाचित तुम्हांला माहिती नसेल, आपले हाथ अनेक प्रकारचे आजार दूर करण्यास मदत करत. ह्या गोष्टीचा उल्लेख आपल्या शास्त्रात सुद्धा केला गेला आहे. जरी, हस्तमुद्रांचा वापर सुरुवातीला तप साधनेसाठी होत होता, पण नंतर ह्याचे वैज्ञानिक संदर्भ समजले गेले आणि ह्याचा वापर वैज्ञानिक दृष्ट्या आजार दूर करण्यासाठी केला जाऊ लागला. तर आज आम्ही सांगणार आहोत कि हाताच्या कुठल्या बोटाचा प्रयोग करून आपण कोणत्या प्रकारचे आजार स्वतःच दूर करू शकतात.

आपले हात आपल्याला विविध आजारांपासून बचाव करण्याची ताकद देतात. हे आपल्याला रोगांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात. हेच कारण आहे की, आपले शास्त्र आपल्याला हस्त मुद्रांचे ज्ञान देते. पतांजलि योग सुत्रांशिवाय ही असे बरेच ग्रंथ आहेत ज्यांमधे हस्त मुद्रांविषयी माहिती मिळते. तर चला आज जाणुन घेउया, योग शास्त्रामधे सांगितली गेलेली एका अश्या हस्त मुद्रेविशायी जे केल्याने तुम्हाला मिळतील हे अद्भुत फायदे. सर्वात पहिलं तुम्हाला सांगू इच्छितो कि हाताची बोटं शरीराच्या वेगवेगळ्या अंगांना जोडलेली असतात. आपल्या बोटांच्या बहुतेक नसा चे सरळ संबंध आपल्या शारीरिक अवयवांशी असतो. तज्ञांनीसुद्धा ह्या गोष्टी मान्य केल्या आहेत कि शरीराचे बहुतेक आजारांचे इलाज आणि त्या आजारांच्या वाढीला रोखण्यास बोटं खूप महत्वाची असतात. बोटांच्या द्वारे ह्या रोगांचे इलाज सुद्धा केले जाऊ शकते.


निसर्ग नियमानुसार आपल्या हाताची पाचही बोटे एका विशेष घटकाचे प्रतिनिधित्व करतात.

याचे अद्भुत फायदे…

फक्त १ मिनिट रोज या बोटास दाबून ठेवल्याने या मोठ मोठ्या ५० रोगांचा नाश होतो. नक्की करून पहा. जे अश्या प्रकारे आहेत.

*१. अंगठा – आग घटक,
*२. तर्जनी (इंडेक्स फिंगर)– हवेतील घटक.
*३. मध्यमा (मिडल फिंगर) – आकाश घटक.
*४. अनामिका (रिंग फिंगर) – पृथ्वी घटक.
*५. करंगळी – पाणी घटक.

बोटांची रचना…
तळहातावर शरीराच्या प्रत्येक भागासाठी एक विशेष प्रेशर पोईंट आहे. त्याला दाबल्यास विलक्षण फायदे होऊ शकतात. हस्त मुद्रांच्या माध्यमातून हेच केले जाते. जसे तुम्ही जर रोज निर्देशांक बोटास म्हणजेच मिडल फिंगर ला कमीत कमी २ ते ३ वेळेस ६० सेकंदांसाठी चोळाल. या ठिकाणी हळुवार पणे दाब दिल्याने, बद्धकोष्ठता (कब्ज) पासून सुटका मिळते. सोबतच पोटाशी निगडीत बरेच आजारहि औषधी न घेता बरे होऊ शकतात.

अंगठा आणि इंडेक्स फिंगरला मिळून फक्त मुद्रा हि बनवली तरीसुद्धा कब्ज, मुळव्याध आणि मुत्राशी निगडीत आजारांमध्ये फायद्याचे ठरते. सोबतच, वाढलेल्या वजनास कमी करायला सुद्धा ह्या मुद्रा मदतगार ठरू शकतात.

तर चला बघूया कोणत्या बोटामुळे कोणते फायदे होतात ते…

१. तर्जनी (इंडेक्स फिंगर)…
सर्वात पहिले तर्जनी बोटाची माहिती जाणून घेऊया. तर्जनीला इंग्रजी मध्ये इंडेक्स फिंगर सुद्धा बोलले जाते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, ह्या बोटाला हलक्या हाथाने चोळल्याने पोटासंबंधी त्रास दूर केला जाऊ शकतो. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर कोणाला बद्धकोष्टता चा त्रास होत असेल तर रोज दिवसातून २ ते ३ वेळा ह्या बोटाला फक्त ६० सेकंड्स साठी चोळल्याने आराम मिळतो.

२. मधले बोट (मिडल फिंगर)…
जर तुम्हांला रात्री झोप येत नसेल किंवा खूप उशीरा झोप येत असेल तर झोपण्याअगोदर फक्त एक मिनिटासाठी तुमचे मधले बोट चोळा. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, असं करण्याने शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रित होतो आणि मानसिक तणाव दूर होतो. ह्या दोघांना नियंत्रित करण्यामुळे चांगली झोप येते.

३. अनामिका बोट (रिंग फिंगर)…
अनामिका बोटाला रिंग फिंगर सुद्धा बोलले जाते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार ह्या बोटाला चोळल्याने अनेक फायदे होतात. तज्ञांच्या म्हणण्यानुसार ह्या बोटाला चोळल्याने पोटासंबंधित त्रासांपासून सुटका होते आणि कोणाला बद्धकोष्ठताचा त्रास होत असेल तर त्याने रोज १ मिनिट हे बोट चोळल्याने हि समस्या दूर होऊ शकते.

४. करंगळी (स्मॉल फिंगर)
करंगळी बोट म्हणजे हाताचे सर्वात छोटे बोट. हाथाचे हे बोट दिसण्यास सर्वात छोटे असते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार. ह्या बोटाला दिवसातून कमीत कमी १ मिनिटासाठी रोज चोळल्याने जर कोणाला मायग्रेनची समस्या असेल तर त्यापासून अराम मिळतो. म्हणून जर तुम्हाला मायग्रेनची समस्या असेल तर दिवसातून एकदा हा प्रयोग करून बघा.

५. अंगठा (थम्ब्ज)…
हाताच्या चार बोटांच्या फायद्याप्रमाणे अंगठा चोळ्याल्याने सुद्धा फायदा होतो. हाताच्या अंगठ्याने वेगवेगळ्या आजारांना दूर केले जाऊ शकते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार अंगठ्याला दिवसातून एक मिनिटं चोळल्याने फुफ्फुसं मजबूत होतात. तज्ञांच्या मतानुसार, जर कोणाला श्वसनसंबंधी त्रास असेल तर त्यांनी ह्या प्रयोग नियमित केला पाहिजे, लवकर फरक जाणवेल.

*माहिती आवडल्यास आपल्या पर्यंत सिमित न ठेवता ईतर ग्रुपवर शेअर करा 📲 आणि तुमचे अभिप्राय कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा.

स्वाती बोरसे

Vadodara Gujarat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *