March 10, 2026

मोकळीक

मोकळीक


लग्न झाल्यापासून ती सतत एकापाठोपाठ एक अश्या जबाबदारऱ्यांमध्ये, नात्यांच्या गोतावळ्यात, नवरा – मुलं, आजारपण, सण – समारंभ, गृहकलह यात ती व्यस्त असते. एवढ्या वर्षात तिला डोकं वर काढायला वेळ मिळत नाही. प्रत्येकीला या साऱ्यातून जावचं लागतं. संसाराची तारेवरची कसरत करता करता १५, २० वर्षे सहज निघून जातात. आणि मग तिच्या आयुष्यात येते थोडी स्थिरता, थोडी मोकळीक! ……


आयुष्याच्या या तिच्या पन्नाशीचा वळणावर ती भक्कमपणे पाय रोऊन संसारात उभी असते. अनुभवाची शिदोरी तिच्याकडे असते. आत्मविश्वास तिच्या चालण्या – बोलण्यात – वागण्यात आपसूकच दिसतो. नवखेपणा, अवघडलेपणा तिच्यात नावालाही जाणवत नाही. अचूक निर्णय ती वेळोवेळी घेते. वागण्या – बोलण्यातील तारतम्य, कामाचा उरक, घरगुती राजकारणी खेळी ती सहज खेळते. संसारातील नात्यांचे गमक तिला उलगडलेले असते. पै – पाहुण्यांचं दडपण तिला येत नाही. घराचे अधिकार तिच्याकडे असल्याने कोणती भाजी करायची ते कोणती वस्तू घ्यायची हे सगळं ती कुशलतेने करते.
संसाराची घडी व्यवस्थित बसलेली असते. जबाबदार्‍या कमी झालेल्या असतात किंवा ती त्या वकुबीने हाताळते . या वेळी तिला मोकळीक मिळते. मग ती छान राहते. छान दिसण्याचा प्रयत्न करते. वयाची झाक चेहर्‍यावर, केसांवर दिसू लागते. यावर घरगुती, पार्लरमध्ये जाऊन उपाययोजना करते.
या वयात वजनाचा काटाही “वाढता वाढता वाढे” असतो. त्यामुळे मग वजन कमी करण्याचे आटोकाट प्रयत्न केले जातात. फिरायला जाणे, सूर्यनमस्कार घालणे, दोनदाच जेवणे, वजन कमी करण्यासाठीचे व्हिडिओ बघणे. असे सगळे प्रयोग सुरू असतात. यातलं टिकाऊ काही नसतं…..
स्वतः च्या सौंदर्याकडे ती जातीने लक्ष देते. कपड्यांच्या बाबतीतही हेच. कपड्यातील तोच – तो पणा टाकून ती नवनवीन फॅशनचे कपडे घालून मिरवते. मेकअप करते. याआधी ती लीपस्टीक च्या वर कधी गेलेली नसते. आता मात्र ती छान मेकअप करते. आजपर्यंत एवढ लक्ष तिने स्वतःकडे दिलेलं नसतं. सगळी हौस ती करते.


याच काळात तिचं मन भूतकाळात फार रमतं. माहेरचे, लहानपणीचे, शाळा-कॉलेजचे दिवस, मैञिणी, गप्पा, मावश्या – मामा, भावंड हे सगळं तिच्या मनात रुंजी घालतं. १५, २० वर्षात आपल्याभोवतीचं लहान झालेलं वर्तुळ ती विस्तारण्याचा, मोठं करण्याचा प्रयत्न करते.
या काळात मैञिणी तिच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सगळ्या सुखं – दुःखाच्या त्या भागीदार असतात. त्यांच्यासोबत ती दिलखुलास हसते, गप्पांमध्ये रंगते, हॉटेलींग करते, सहलीला जाऊन धमाल करते, छान – छान फोटो काढून ती शेअर करते. आयुष्याचा भरभरून आस्वाद घेते. कधीही न केलेलं नाईटाऊट ती मैञिणी सोबत करते. भिशीला जाऊन आली की ती फ्रेश होते.
कधी कधी निराशा दाटून येते, एकटेपणा जाणवतो, राग अनावर होतो. अशावेळी नवरा, मैञिणी सावरतात. अध्यात्माकडे थोडा कल वाढतो. त्यामुळे मनःशांती मिळून मनःशक्ती वाढते.


तिच्या आयुष्यात येणाऱ्या मोकळीकीला ती अशी सामोरी जाते. भरभरून जगते, आनंदी राहते. आणि म्हणूनच ती पन्नाशीत छान दिसते.
हे सगळं माझ्या पन्नाशीचा आसपासच्या मैञिणींसाठी…….!


NutriPro Juicer Mixer Grinder – Smoothie Maker – 500 Watts (2 Jars & 1 Blade, Silver) – 2 Year Warranty

SOFTSPUN Microfiber Cloth – 4 pcs – 40×40 cms – 340 GSM Grey! Thick Lint & Streak-Free Multipurpose Cloths – Automotive Microfibre Towels for Car Bike Cleaning Polishing Washing & Detailing.

L’Oréal Paris Permanent Hair Colour, Radiant At-Home Hair Colour with up to 100% Grey Coverage, Pro-Keratin, Up to 8 Weeks of Colour, Excellence Crème, 3 Natural Darkest Brown, 72ml+100g

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *