🫀खाण्यात थोडा बदल झाला की पोट बिघडते? घरीच करा आजीच्या बटव्यातील ३ सोपे उपाय, मिळेल झटपट आराम.
हवा, पाणी किंवा खाण्यात थोडा बदल झाला की पोटदुखीची समस्या ठरलेलीच असते. पोट एकदा दुखायला लागले की आपल्याला काहीच सुचत नाही. कधी पोटात खूप गॅस फिरल्यासारखे होते तर कधी सतत आत जावे लागते. जुलाब झाले असतील तर अंगातील पूर्ण त्राणच जातो आणि काहीही करण्याची ताकद शिल्लक राहत नाही. अशावेळी पोटाचे बिघडलेले गणित सुरळीत होण्यासाठी आणि जागेवर येण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो
पण लगेचच डॉक्टरांकडे जाऊन औषधे घेण्यापेक्षा काही घरगुती उपायांनी ही समस्या नियंत्रणात येण्याची शक्यता असते. पण यासाठी आजीच्या बटव्यातील हे उपाय आपल्याला माहीत असायला हवेत. या उपायांचे इतर कोणतेही साइड इफेक्ट नसल्याने अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी आपण हे उपाय करू शकतो.पाहुयात घरच्या घरी करता येणारे हे सोपे उपाय कोणते..
🔖कोरी कॉफी आणि लिंबू :
कॉफिमध्ये असणारा कॅफेन हा घटक जुलाबसारख्या समस्येवर अतिशय उपयुक्त असतो. यामध्ये लिंबू पिळल्याने व्हिटॅमिन सी आणि कॅफेन यांची क्रिया होते आणि पोट ठीक व्हायला झटपट मदत होते.
🔖ओवा आणि कोमट पाणी :
हवेत बदल झाला की पोटात गॅस फिरणे, सतत करपट ढेकर येणे अशाप्रकारचे त्रास उद्भवतात. काहीवेळा पोटात कळ येऊन संडासला जावे लागते. अशाप्रकारे अपचनाचा त्रास होत असेल तर ओवा थोडा भाजून घ्यावा. तो दाताखाली ठेऊन चावावा आणि त्यावर कोमट पाणी प्यावे. यामुळे पचन क्रियेतील अडथळे दूर होण्यास मदत होते.