January 24, 2026

ऍसिडिटी वर कायम स्वरूपी उपाय

ऍसिडिटी वर कायम स्वरूपी उपाय

ऍसिडिटी मध्ये कुठले पदार्थ खावे :-


पाले भाज्या, फळ भाज्या,(काच्या स्वरूपात),नारळ पाणी, तरबुजचा रस आणि बरीच फळे ही अल्कलाईन असतात.

ऍसिडीटी मध्ये कुठले पदार्थ खाऊ नये :-

                  बेकरी पदार्थ(बिस्कीट, केक,खारी,जास्त थंड पदार्थ व मैदाचे पदार्थ)

जास्त तेलकट, जास्त प्रोसेस(चायनीज, डब्बा बंद पेय)
तसेच उपाशी पोटी चहा घेणे टाळावे, बंद केला तर उत्तमच.

उपाय:


नैसर्गिकरित्या ऍसिडिटी कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे एक ग्लास टरबूजचा रस किंवा नारळाचे पाणी. आपण आपल्या आहारात सलाद,केळी, काकडी किंवा दही देखील समाविष्ट करू शकता. ते आम्लतेसाठी त्वरित आराम प्रदान करतात.

*ऍसिडिटीची इतर करणे:-


अवेळी जेवण, खूप वेळ उपाशी राहणे आणि एकदम पोटभरून खाणे, मानसिक त्रास, झोप कमी घेणे किंवा रात्री वेळे वर न झोपणे, (10pm ते 4pm वेळेत झोप ही आरोग्यास उत्तम)
सतत चिडचिड करणे, जास्त रागावणे, बद्धकोष्ठता, तसेच अतिप्रमाणात किंवा सतत औषधींचा वापर करणे. इ.

दिवसात काय बदल करायला हवे:-


सकाळी लवकर उठुन योग, प्राणायाम, ध्यान किंवा कुठल्या प्रकारचा व्यायाम करणे.
कुठंल्या ही गोष्टीचे अति टेन्शन घेणे नाही, कुठले ही काम आनंदाने करणे. ज्या गोष्टीमुळे त्रास होत किंवा चिडचिड होते अश्या गोष्टी पासून लांब राहणे उत्तम. जेवणाच्या वेळा निश्चिंत करा. नॉर्मल व्यक्ती ने दिवसात 3-4लिटर पाणी प्यावे.
जेवताना अन्न बारीक करूनच गिळा.
रात्री 10 च्या नंतर जगू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *