चिकुनगुनिया
मित्रांनो, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, या दिवसात साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन, एडिस प्रजातीच्या डासांच्या चावण्यामुळे होतो आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित होतो, चिकुनगुनिया हा एक विषाणूजन्य आजार आहे, आणि त्याची लक्षणं डेंग्यूसारखीच असतात. चिकुनगुनियामुळे भरपूर ताप येणे, हात-पायांवर पुरळ उठणे, सांधेदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा जाणवणे, मळमळ, स्नायू दुखणे, थकवा यासारख्या समस्यां उद्भवतात…
घरगुती उपाय:-
💠 पपईची सात ते आठ पानं घेऊन ती नीट धुवून बारीक पेस्ट करुन त्याच्या पिळून रस काढावा. दर तीन चार तासांच्या अंतराने हा रस दोन चमचे घेतल्यास प्लेटलेट ची संख्या वाढून लवकर बर होण्यास मदत होते…
💠 लसणाच्या दोन तीन पाकळ्या, भीमसेनी कापूर, दोन चमचे खोबरेलतेल एक चमचा एरंडतेल गरम करून सांध्यांना लावल्यास फायदा होईल…
💠 गुळवेलचा एक ग्रॅम रस किंवा एक गुळवेल कॅप्सूल सकाळ संध्याकाळ घेऊ शकता…
💠 शेवग्याच्या शेंगा, पाल्याची भाजी तसेच त्याच्या बियांचे सूप…
💠 दुग्धजन्य पदार्थ, दूध, सुके अंजीर याचे सेवन करावे. दुधात दोन सुके अंजीर घालून घ्यावे…
💠 नारळ (शहाळी) पाणी पिल्याने शरीरातील ओलवा टिकतोच तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते…
💠 आहारात हिरव्या पालेभाज्यांचे आवर्जून सेवन करावे…
💠 एक ग्लास पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळून सेवन करा…
💠 मांसाहार वर्ज्य करावा, हलका शाकाहार घ्यावा…
💠 वज्रासन, पद्मासन, नौकासन, भुजंगासन, पवनमुक्तासन, पश्चिमोत्तानासन, गोमुखासन, ताडासन, यासारखे हलके व्यायाम जमेल तसे करावेत. शक्य झाल्यास सूर्यनमस्कार करावेत. हातापायांची हालचाल होईल इकडे लक्ष द्यावे…
💠 रोज सकाळी उठल्यावर गवतावर अनवाणी चालावे. रोज थोडे थोडे अंतर वाढवावे…
💠 सांध्यांना किंचित कोमट तीळ तेलाने पाच दहा मिनिटे गोलाकार मसाज करावा. त्यानंतर अर्ध्या तासाने गरम पाण्याने अंघोळ करावी…
💠 _सर्वात महत्त्वाचे म्हणजे परिसर स्वच्छ ठेवा, मच्छर प्रतिबंधक क्रीम, मच्छरदाणी यांचा वापर करा, शरीर झाकणारे कपडे घाला, रोगाचा प्रसार झालेल्या भागात जाणे टाळा…
टीप:-
माहिती आवडल्यास सर्व ग्रुप वर शेअर करा, गरजूंना उपयोग होईल…
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻