October 4, 2024

मदर्स डे – (MOTHER’S DAY)

आई म्हणजे प्रेम, माया, वात्सल्याचा सागर आहे. आईच्या उपकारांची महती अपार आहे. तिच्या उपकारांची परतफेड कुणीच करू शकत नाही, हे माहीत असूनही आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगात मातृ दिन साजरा केला जातो.


मे महिन्याचा दुसरा रविवार हा पाश्चिमात्य देशात मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. मातृ दिनाचा इतिहास खूप प्राचीन आहे. 16 व्या शतकापासून इंग्लडमध्ये एक मोठा समुदाय प्रभू येशूची आई मदर मेरीचा सन्मान करत असे. अमेरिकेचे राष्ट्रपती वूडरो विल्सन यांनी 1914 मध्ये मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी मदर्स डे साजरा करण्याचे जाहीर केले. तेव्हापासून अमेरिकेत मातृ दिन साजरा केला जात आहे. अमेरिकेत साजरा करणारा मदर्स डे हल्ली सर्वत्र साजरा केला जात आहे. मातेला प्रणाम करण्याचा, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाचा हा दिवस. मात्र,आईवरचे प्रेम व्यक्त करणासाठी एक दिवस पुरेसा आहे का? भारतीय संस्कृतीत आई ही संकल्पनाच अशी आहे की, तिच्यासाठी एखादा दिवस साजरा करणे ही औपचारिकताच ठरेल. शिवाय ही संकल्पना इतकी व्यापक आहे की, ती आपण मोजमाप करता येत नाही. भारतीय संस्कृतीत आईला ईश्वराचे रूप मानले आहे. कोणतेही कार्य करण्याच्या आधी सर्वप्रथम आईचा आशीर्वाद घेतला जातो. आई ही हृदयातून आलेली प्रेमळ साद आहे.तिच्या पदराखाली वाटणारी सुरक्षिता दुसरीकडे कुठेही मिळत नाही. ममता, माया आणि खरा आपलेपणाचा चिरंतन ओलावा, अनेक समस्यांवरचा एकच उपाय आई होय. रडणारे बाळ आईकडे दिले की लगेच शांत होते. बाळाला हाताला धरून चालायला शिकवणारी आईच जन्म घेणार्‍या प्रत्येकाची पहिली गुरू असते. तीच मुलांना लहानाचे मोठे करून त्यांच्यावर संस्कार करते. मुलांच्या सर्व चुकांवर पांघरूण घालणारी आईच असते. मुलांना जिवापार जपणारी, सुख-दु:खांत पाठीशी उभी असते ती फक्त आई. आई आपल्या श्वासात वास करत असते. दूर असली तरी मुलांच्याच काळजीत अललेलं एक नातं म्हणजे आई.आई सकाळी उठल्यापासून आपल्या पिलांसाठी राबत असते. एक वेळेस स्वत: उपाशी राहील; पण आपल्या पिलांना पोटभर खाऊ खातल्याशिवाय तिला चैन पडत नाही. मुलांना काय हवे, काय नको याची काळजी घेणारी ती असते. स्वत: जळत दुसर्‍यांना प्रकाशात ठेवण्याचे काम ती करते. व्यक्तिमत्त्व घडवणार्‍या आईचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही; परंतु नवकाळात आता आई म्हणणारे फार कमी आहेत. आईची जागा आता मम्मीने घेतली आहे. आई या शब्दात जितके प्रेम आहे, ते मम्मी या शब्दात असेलच असे नाही. कितीही आधुनिकीकरण झाले, तरी जगात आईची प्रतिमा कधी न बदलणारी आहे.

आई आणि मुलांचं नातं खूप खास असतं. त्यामुळे, अनेकदा ‘आई तू अशीच आहेस म्हणत…’ आईकडे आपण तक्रार करतो. कधी प्रेमाने तर कधी रागाने… पण, मातृत्व साजरा करणारा दिवस पुरेसे नाही आणि आपल्या आईवर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आपण प्रत्येक दिवस मदर्स डे म्हणून खास बनवला पाहिजे. ‘अशीच आहे माझी आई..’ म्हणत हे भाषण करून करा. तुमच्या आईलाही तुमचा अभिमान वाटेल.

आई माझा गुरू, आई माझा कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी… मूल उदरात असल्यापासून ते जीवात-जीव असेपर्यंत आपल्या मुलांवर अपार प्रेम करणारी दैवी कलाकृती म्हणजे ‘आई’. आई या शब्दाची फोड केल्यास, ‘आ’ म्हणजे ‘आत्मा’ आणि ‘ई’ म्हणजे ‘ईश्वर’ अशीच केली जाते. आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली, तरी आईची महती लिहून पूर्ण केली जाऊ शकत नाही.

आई मुलांवर संस्कार करते, शिकवते, स्वावलंबनाचे धडे देते; प्रसंगी मुलांसाठी वाटले ते करायला ती तयार असते. आई झाल्यावरच आईचे आईपण कळते, असे नेहमीच बोलले जाते. आईच्या प्रेमाचे ऋण कधीही न फिटणारे आहे. आणि म्हणूनच, पृथ्वी तलावरील सर्व मातांविषयी व्यक्त होण्याचा दिवस म्हणजे मदर्स डे.


दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात ‘मातृदिन’ म्हणजेच ‘मदर्स डे’ साजरा केला जातो. यंदा, १२ मे या दिवशी Mother’s Day साजरा केला जाणार आहे. पण, मातृदिनाला सुरुवात कशी झाली तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया या दिवसमागचा इतिहास आणि या दिवसाचाही महत्त्व.
देव’ प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही नाही, म्हणून त्याने आईची निर्मिती केली. जगातील प्रत्येक सजीवांला जन्म देणारी त्याची जननी म्हणजेच आई असते. ‘आई’ या दोन अक्षरी शब्दात प्रेम, वात्सल्य, माया, ममता, शिस्त असे अनेक भाव दडले आहेत. आपल्या मुलांचे अपराध पोटात घेणारी, संकटाच्या वेळी त्यांना साथ देणारी आणि प्रसंगी धीर देत कुशीत घेणारी, आपल्या चिमुकल्यांच्या प्रगतीसाठी झटणारी आई साक्षात देवाचे एक रूप असते असे म्हटले जाते आणि ते खरंच आहे.

इतर वेळी आईला आपल्या आयुष्यात गृहीत धरून असतो, तिची वेगळी दखल घ्यावीशी आपल्याला वाटत नाही. पण, ठेच लागल्यावरही पहिल्यादा आईचीच आठवण येते. पण, काही असले तरी आईबद्दल भरभरून बोलले जाते ते म्हणजे मातृदिनी. जगभरात ‘मदर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. काही देश वेगवेगळ्या तारखांना हा दिवस साजरा करतात, पण भारत, अमेरिका (यूएसए), कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह काही देशांमध्ये मे महिन्याचा दुसरा रविवार मातृदिन म्हणजेच Mother’s Day म्हणून साजरा केला जातो. ही परंपरा सुमारे ११२ वर्षांपासून सुरू आहे. पण आज आम्ही तुम्हाला या दिवसाबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत. या दिवसाची सुरुवात कशी झाली? हा दिवस आईला समर्पित करण्यामागचा नेमका उद्देश काय? जाणून घेऊ…

हा आहे मदर्स डेचा इतिहास :


मदर्स डेचा इतिहासचा संबंध ग्रीस देशाशी आहे. ज्याला युनान असेही म्हणतात. प्राचीन काळी ग्रीक आणि रोमन लोक रिया आणि सायबेले या मातृदेवतांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करत होते. मात्र याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. पण आधुनिक काळात म्हणजे २० व्या शतकात अमेरिकेत पहिल्यांदा मदर्स डे साजरा केल्याचा इतिहास असल्याचे सांगितले जाते.

अशी झाली मदर्स डेची सुरुवात :


आईला सन्मान देणाऱ्या मातृदिनाची सुरुवात अमेरिकेत झाली. अॅक्टिविस्ट अॅना जार्विस यांनी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. आईचे अथक परिश्रम, तिचे बलिदान आणि समाजसेवेतील तिची भूमिका यांमुळे त्यांना खूप प्रेरणा मिळाली. Anna Jarvis यांचे त्यांच्या आईवर खूप प्रेम होते, पण जेव्हा आईचे निधन झाले तेव्हा आईबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी मदर्स डेची सुरुवात केली. कालांतराने, इतर अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली.


मेच्या दुसऱ्या रविवारीच का साजरा करतात ‘मदर्स डे’?
९ मे १९१४ रोजी अमेरिकेचे तत्कालीन २८ वे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला. ज्यामध्ये लिहिले होते की, मेच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जाईल. यानंतर अमेरिकेसह इतर देशांमध्येही हा दिवस साजरा केला जाऊ लागला. १९०८ मध्ये अमेरिकन काँग्रेसने मदर्स डेला अधिकृत सुट्टी देण्याचा प्रस्ताव नाकारला, पण अॅना जार्विस यांच्या प्रयत्नांमुळे १९११ पर्यंत अमेरिकेतील अनेक राज्यांनी या दिनानिमित्त सुट्टी जाहीर केली, त्यांपैकी काहींनी अधिकृतपणे मदर्स डेला स्थानिक सुट्टी म्हणून मान्यता दिली.

या दिवसाचे महत्त्व काय ?

मदर्स डे हा एक विशेष दिवस आहे जो आपल्या आईबद्दल प्रेम, कौतुक दर्शवण्यासाठी समर्पित आहे. आपल्या मुलांचे संगोपन करणाऱ्या माता, कुटुंब आणि समाजासाठी त्याग आणि समर्पण करणाऱ्या मातांच्या सन्मानासाठी हा दिवस साजरा केला जातो.

ज्या माऊलीने दिला आम्हांस जन्म,
जिने गायली आपल्यासाठी अंगाई,
आज मातृदिना दिवशी
नमन करितो तुज आई
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई म्हणजे स्वर्ग
आई म्हणजे सर्व काही
कितीही जन्म घेतले तरी
तुझे ऋण फेडू शकणार नाही
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी आई
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतात दरवर्षी मे महिन्याचा दुसरा रविवार ‘मदर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी १२ मे २०२४ रोजी ‘मदर्स डे’ साजरा केला जाणार आहे. आईला समर्पित हा खास दिवस प्रत्येकासाठी खूप खास असतो. आईचे प्रेम, त्याग आणि समर्पण साजरा करण्यासाठी हा विशेष दिवस साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक मूल आपापल्या परीने आपल्या आईला आपल्या मनात दडलेल्या प्रेमाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला तुमच्या भावना एखाद्या सुंदर भेटवस्तूसह शेअर करायच्या असतील, तर या ‘मदर्स डे’ला अनोख्या भेटवस्तू देऊन तुम्ही दिवस खास बनवू शकता.
कस्टमाइज्ड गिफ्ट्स


आजकाल कस्टमाइज्ड भेटवस्तूंचा ट्रेंड खूप प्रसिद्ध होत आहे. या मदर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या आईला खास वाटण्यासाठी एक छान कस्टमाइज्ड गिफ्ट देखील बनवू शकता. यासाठी तुम्ही सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या अनेक ऑनलाइन वेबसाइट्सची मदत घेऊ शकता, जे अनेक प्रकारचे कस्टमाइज्ड गिफ्ट्स, दिवे, फोटो फ्रेम इत्यादी बनवतात. अशा साईट्सवरून तुम्ही तुमच्या आईच्या नावाने गिफ्ट ऑर्डर करू शकता.

आवडत्या ठिकाणची सहल
जर तुम्ही तुमच्या आईला खूप दिवसांपासून कुठेतरी घेऊन जाऊ शकला नसाल, तर या मदर्स डेला तिला घरातील कामातून थोडासा ब्रेक द्या आणि तिच्या आवडत्या ठिकाणी घेऊन जा. आईचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ कोणती असू शकत नाही.

मोबाईल ठेवता येणारी पर्स


खरेदीसाठी जाताना ‘आई’ मंडळी अनेकदा त्यांचा फोन घेऊन जात नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार अशावेळी फोन पकडायचा कि हातातल्या पिशव्या… या ‘मदर्स डे’च्या दिवशी तुम्ही त्यांची ही समस्या सोडवू शकता. त्यांच्यासाठी तुम्ही मोबाईल ठेवता येईल अशी पर्स खरेदी करू शकता. जेव्हा ती या पर्सचा वापर करेल, तेव्हा ती तुमची आठवण नक्की काढेल.
मूव्ही नाईट

तुमच्या आईला खास वाटण्यासाठी तुम्ही तिच्यासोबत मूव्ही नाईट प्लॅन करू शकता. जर आईला नवीन चित्रपट पाहायचा असेल, तर तिच्यासाठी थिएटरमध्ये आगाऊ तिकीट बुक करा. पण, जर तुम्ही घरी चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर आईचे आवडते स्नॅक्स अगोदरच तयार करा. जेणेकरून तुम्हाला आईसोबत चांगला वेळ घालवता येईल.

सिल्क साडी


तुमची आई ऑफिसला जात असो किंवा गृहिणी असो, तुम्ही तिला मदर्स डेला ‘सिल्क साडी’ भेट देऊ शकता. त्यांना तुमची ही भेट खूप आवडेल. हा मदर्स डे खास बनवण्यासाठी, आईला तिच्या आवडत्या रंगाची सिल्क साडी भेट द्या.

स्वाती बोरसे
Vadodara gujarat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *