March 10, 2026

उन्हाळ्यात सन टॅनिंगची समस्या? हे उपाय नक्की करा

💁‍♂ उन्हाळ्यात सन टॅनिंगची समस्या? हे उपाय नक्की करा

🎯 उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचा काळवंडणे ही मोठी समस्या असते. कडक उन्हामध्ये फिरल्यास चेहऱ्यावर आणि शरीरावर तांबूस काळसर रंगाचे डाग उमटतात, त्यांना सनटॅन म्हटले जाते. उन्हाळ्यात त्वचा कोमल आणि स्वस्थ ठेवणे तसेच सनटॅनपासून बचाव करणे कठिण जाते. या समस्येवर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. जाणून घ्या उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगच्या समस्येसाठी काही सोपे उपाय…

एका वाटीत थंड दही घ्या आणि त्यात थोडी हळद मिसळा. हे मिश्रण आंघोळीच्या वीस मिनिटं आधी सन टॅन झालेल्या जागेवर लावून ठेवा. चेहऱ्यावर, गळ्यावरही लावू शकता. यामुळे टॅनिंग कमी करण्यास चांगली मदत होते.

काकडीच्या काही चकत्या बारिक करुन त्याचं मिश्रण तयार करा. यात दोन चमचे दूध पावडर आणि काही थेंब लिंबू रस मिसळा. हे मिश्रण प्रभावित झालेल्या भागावर लावा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून एक वेळा हा प्रयोग केल्याने त्वचा चमकदार होऊन टॅनिंगही कमी होते.

टॉमेटो दोन भागात कापून त्याच्या एका भागाने त्वचेवर चांगला मसाज करा. टॉमेटोचा रस काढून तोही लावता येतो. यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. टॅनिंगची समस्याही दूर होते.

पपई केवळ खाण्यासाठईच नाही तर त्वचेसाठीही गुणकारी आहे. पपईमुळे त्वचा स्वच्छ होण्यास आणि रंग उजळण्यास मदत होते. पपईचा गर काढून तो हाता-पायांवर, चेहऱ्यावर लावल्याने चांगला फायदा होतो. पपईमुळे त्वचेला पोषणही मिळते.

▪ त्वचेच्या कोणत्याही समस्येसाठी हळद फायदेशीर ठरते. टॅनिंग दूर करण्यासाठी हळद, लिंबू रस आणि कच्चं दूध हे मिश्रण टॅन झालेल्या भागावर लावल्याने फायदा होतो. पहिल्या काही वेळांमध्ये फरक दिसू लागेल.

▪ टॅनिंग घालवण्यासाठी लिंबूचा रस सर्वात सोप्पा आणि अतिशय गुणकारी उपाय आहे. लिंबू रस टॅन झालेल्या जागेवर लावा आणि 15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. यामुळे लवकर फायदा मिळतो. परंतु लिंबू रसाचे अधिक प्रमाणही ठेऊ नये, यामुळे त्वचेला नुकसान पोहचू शकते.

*माहिती आवडल्यास आपल्या पर्यंत सिमित न ठेवता ईतर ग्रुपवर शेअर करा 📲 आणि तुमचे अभिप्राय कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा.

स्वाती बोरसे
Vadodara Gujarat

NutriPro Juicer Mixer Grinder – Smoothie Maker – 500 Watts (2 Jars & 1 Blade, Silver) – 2 Year Warranty

SOFTSPUN Microfiber Cloth – 4 pcs – 40×40 cms – 340 GSM Grey! Thick Lint & Streak-Free Multipurpose Cloths – Automotive Microfibre Towels for Car Bike Cleaning Polishing Washing & Detailing.

L’Oréal Paris Permanent Hair Colour, Radiant At-Home Hair Colour with up to 100% Grey Coverage, Pro-Keratin, Up to 8 Weeks of Colour, Excellence Crème, 3 Natural Darkest Brown, 72ml+100g

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *