हिंदू सनातन संस्कृती मध्ये रोज नित्य नियमाने प्रत्येक जण घरात दोन वेळा पूजा करत असतात. सकाळी उठल्यावर स्नान करून आधी देवपूजा केली त्याने घरातील वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक बनाते. मंदिरात लावला जाणारी निरंजन, धूप , अगरबत्ती त्याने आपल्या आजूबाजूचे वातावरण सुगंधित आणि प्रसन्न होते ; तर मंदिरातील शंक ध्वनी आणि घंटा नादाने आपल्या भोवतालचा परिसर सकारात्मक बनतो. त्यामुळे सकाळी केली पूजा आपल्या घराला, मानला एक नवीन ऊर्जा देते तसेच संध्याकाळी केली जाणारी पूजेला देखील आपल्या धर्म संस्कृतीत तितकच महत्त्व आहे.
बऱ्याच वेळा आताच्या पीठीला प्रश्न पडतो घरातील देवपूजा कधी आणि कशी करावी ???
म्हणजे नेमकी घड्याळी कोणती वेळ ठरवावी ती त्या काळात आपण घरातील देवपूजा करावी
सकाळी पूजा कधी आणि कशी करावी
सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजेला बसावे. देवाचे स्मरण करत पूजेला सुरुवात करावी. कपाळाला गंध लावून घ्यावा. समई आणि उदबत्ती लावून घ्यावे आणि समईला गंध लावून घ्यावा. घरात देवपूजा हि दररोज केली पाहिजे. दररोज नित्यनियमाने पूजा केली तर घर हे प्रसन्न राहते. देवाची पूजा करताना तुमचे मन हे नेहमी प्रसन्न असावे, म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते
ब्रह्म मुहूर्ताला देवतांचा मुहूर्त मानले जाते. सकाळी उठून उपासना केल्यानंतर ईश्वर प्राप्ती होते. पहाटे सर्योदयाच्यावेळी सर्व दैवी शक्ती जागृत होतात. जसे सुर्याच्या पहिल्या किरणाने फूल उमलते अगदी तसेच सकाळी सकाळी सूर्याची किरणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. आता हल्ली काळात सगळेच घाई गडबडीत असतात त्यामुळे सकाळी 6 ते 10 या काळात पूजा करणं अतिशय योग्य वेळ मानली जाते. दुपारी 12 ते 4 ही वेळ पितरांच्या पुजेसाठी शूभ मानली जाते.
सायंकाळी पूजा कधी आणि कशी करावी
सायंकाळ आणि कातरवेळ या दोघांमध्ये फरक असतो . दिवसाला एकूण ०८ प्रहर असतात यात दिवसाला ०४ व रात्रीचे ०४ चे प्रहर असे एकूण ०८ प्रहर असतात. यात दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो ०४ ते ०७ वाजे पर्यत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो. संध्या मध्ये सुर्य अस्ताची वेळ आणि सुर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातरवेळ असते. जी सध्या ६.४५ ते ७.३० आहे. दिनमानानुसार ती बदलत जाते जसे की उत्तरायणात सुर्यास्त ऊशीरा होतो तर दक्षिणायणात सुर्यास्त लवकर होतो त्यामूळे संध्या समय वरखाली होतो त्यामूळे दिनमानानुसार कातरवेळ बदलते.
काही लोक सांगतात ७.३७ ला दिवा लावावा कारण कामाख्या देवीचा दिवा हा ७.३७ लावतात परंतू पूर्वी तसे नव्हते पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावाची मुख्य अधिपती होती. गावात वरसकी पद्धती असायची यात गावातील प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे ज्याची वरसकी असेल तो सुर्य अस्त झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावत. दिवा लावल्यावर घंटानाद होत असे. घंटानाद ऐकताच सर्व जण आपआपल्या घरात देवाला व तुळशीला दिवाबत्ती लावत. त्यावेळी ग्रामदेवतेला मोठा मान-पान होता, ग्रामदेवताची दिवाबत्ती लावल्यानंतरच गावात प्रत्येक घराची दिवाबत्ती लागत असे या मागचे कारण असे की ग्रामदेवता दिवाबत्ती लावल्यावर राखणदारा सोबत फेरफटका मारते व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे वास करते. कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रुप धारण करुन जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते. म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो. कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रुपाने वावरत आहे. तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत त्या कातारवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशी जवळ दिवा लावला जातो.
संध्याकाळी 6.30 नंतर केव्हाही दिवा लावावा, दिवा लावल्यावर घरातील सुवासींनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे कारण लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे. आणि उंबरठ्यावर हळद कुंकू वहावे.
देवाजवळ आणि तुळशीजवळ
दिवा लावून देव अन् दिवा यांना नमस्कार करावा !
सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर ४८ मिनिटांच्या (दोन घटिकांच्या) काळाला ‘संधीकाल’, असे म्हणतात. संधीकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ, तसेच अंगणातील तुळशी वृंदावनातील किंवा घरात कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.
स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या संधीकालात दिवा लावणे शक्य न झाल्यास स्नान न करता लावला तरी चालेल. तसेही शक्य न झाल्यास सूर्योदयानंतर लावावा. सूर्यास्तानंतरच्या संधीकालातही दिवा लावावा. (खरे तर देवाजवळ दिवा २४ घंटे तेवत असायला हवा.)
दिनमानाप्रमाणे देवाच्या नित्योपचारात बदल होत असतात . दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी व सायंकाळची उशीर करावी . दिवस लहान होत गेला कि सकाळची पूजा उशीरा आणि सायंकाळची लवकर . या दोन विभागात दोन्ही वेळेच्या पूजेचे टाईमिंग फिक्स ठेवा . आणि पूजा , दिवेलागण करा .
लेखिका
स्वाती बोरसे ,
वडोदरा, गुजरात