“लाभले आम्हास भाग्य,
बोलतो मराठी!
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी”!!!!!
कवी सुरेश भट यांचे सुंदर हे काव्य …..आपली मातृभाषा मायबोली मराठी असल्याचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला असतोच . तो महाराष्ट्रात राहणारा असो की पर राष्ट्रात , परदेशात जरी स्थायी झाला तरी मराठी माणूस आपल्या मातृभाषेला कधीच विसरत नाही . मायबोलीचा अभिमान मराठी माणसाच्या मनातच नाही तर रक्तात असतो .
मराठी मायबोलीचा उगम हा सगळ्या भाषेची जननी असलेली संस्कृत भाषेतून झाला. पण मराठी मायबोली ने जन्म दिला तो मराठी वडगमयाला आणि मराठी साहित्याला….!!
मराठी साहित्य हा एक खजिना आहे त्यात अनेक कसे ग्रंथ, कथा, बोधकथा, वेद, कादंबरी , लेख, ललित लेखन ,काव्या ,इत्यादी रत्न आणि हिरे आपल्याला अवगत झाले आहेत , त्या पासून आपण आपल्या मराठी साहित्य माळेला रेशमी मराठी मायबोली रुपी दोऱ्याने घट्ट बांधून ठेवलेले आहेत….. ह्या साहित्य खाजण्यातून आपणास संतांच्या मुखात उद्गरलेले अभंग , भावगीते, भक्तिगीते यांचा अमूल्य ठेवा लाभला आहे . आपल्या मराठी मायबोलीला जुनी संस्कृती, परंपरा जपणारी गरुड गीत, भारुड गीत लाभली. श्री छत्रपती शिवाजी महारजांच्या सन्मान साठी गायले जाणारे पोवाडे देखील आपणास आपल्या मायबोली साहित्या नेच अर्पण केले.
मराठी मायबोलीचे अनेक लेखक , कादंबरीकार, कवियत्री यांनी त्यांच्या कल्पना शक्ती आणि सुवर्ण अक्षरांनी मराठी साहित्याला एक नवीन ओळख निर्माण करून दिली . जगभरात मराठी साहित्य हे एक आपले नवीन उच्चांक प्रस्थापित करून संपूर्ण जगभरात ज्ञानप्रकाश पसरवत आहे. अश्या मराठी साहित्यात मराठी मायबोली ला सगळ्यात उंच असा स्थान आहे, शिवरायांच्या पोवड्यातून मायबोली मराठी साहित्यात सिंहासनावर विराजमान आहे . संत ज्ञानेशवरांनी मराठी मायबोलीला मराठी साहित्याच्या ह्र्दयात स्थान प्रस्थपित केले आहे, संत तुकारामाच्या अभंग आणि ओव्या मराठी मायबोलीला मराठी साहित्यात च नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आपली आईची माया आणि ऊब देणार आसन प्रदान केलं आहे.
आता आपल्या नव्या पिठीला आपली मराठी मायबोली साठी एकच करावे अशी विनंती ;नव्या पिढीने यापुढे येणाऱ्या पिढीला मराठी मायबोली शिकवावी आणि मराठी मायबोली चे स्थान मराठी साहित्यात अजून उंचवावे ……!!!!!
स्वाती बोरसे,
वडोदरा गुजरात