October 2, 2024

ब्रह्ममुहूर्ता म्हणजे काय???

21 व्या शतकातील कलयुगत आपण सध्या राहत आहोत; तरी देखील आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युगात जगणाऱ्या डिजिटल पिढीने आपली संस्कृती, परंपरा,रूढी ह्या सगळ्यांना एक विशिष्ट स्थान त्यांच्या रोजच्या जीवनशैली मध्ये दिले आहे. आजी -आजोबां कडून त्यांना आपल्या जुन्या अनेक पारंपरिक पद्धती तसेच संस्कारांचे ज्ञान नेहमीच लाभते . त्यानं अनेक वेळा सकाळी ब्रह्ममुहूर्ता मध्ये उठून अभ्यास करावा किंवा ज्या कामात तुम्हाला यश पाहिजे असेल तर ती कामे ब्रह्ममुहूर्तात उठून करावी असे बरेच वेळा सांगितले जाते.. त्या करता नेहमी कानी पडणारे श्लोक जवळपास सगळ्यांच्याच घरात बोलले जातात …
“लवकर निजे, लवकर उठे,
तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती लाभे”

पण नेमका प्रश्न पडतो तो म्हणजे ब्रह्ममुहूर्ता म्हणजे नेमकं काय?? त्यात काय करावे?? त्याचे काय फायदे ???

ब्रह्ममुहूर्ता म्हणजे काय???


आपल्या अनेक ग्रंथात ब्रह्ममुहूर्ता विषयी माहिती नमूद केलेली आहे. आपल्या ऋषी मुनींनी या मुहुर्ताचे विशेष महत्व सांगितले आहे. त्यांच्या अनुसार हा काळ झोपेचा त्याग करण्यासाठी सर्वोत्तम आहे. ब्रम्ह मुहुर्तामध्ये उठल्याने सौंदर्य, शक्ती, विद्या, बुद्धि आणि निरोगी आयुष्याची प्राप्ती होते. सूर्योदयापूर्वी चार घडी आधी ( अंदाजे दिड तास) ब्रम्ह मुहुर्तामध्ये उठणे चांगले.
ब्रह्म मुहूर्त म्हणजे रात्री प्रहार नंतरचा आणि सूर्योदयापूर्वीचा काळ. पहाटे 4 ते 5.30 या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात.


हिंदू धर्माशी निगडीत वेद पुराणांमध्ये आणि शास्त्रांमध्ये ब्रम्ह मुहुर्ताला खास आणि शुभ मानले जाते. रात्रीच्या शेवटच्या प्रहरा नंतर आणि सूर्योदयाच्या आधीच्या प्रहराला ब्रम्ह मुहूर्त मानले जाते. म्हणजेच सकाळी ४ ते ५:३० पर्यंतचा काळ ब्रम्ह मुहूर्त मानला जातो. आपल्या ऋषी मुनींनी या मुहुर्ताचे विशेष महत्व सांगितले आहे. त्यांच्या अनुसार हा काळ झोपेचा त्याग करण्यासाठी सर्वोत्तम आहे. ब्रम्ह मुहुर्तामध्ये उठल्याने सौंदर्य, शक्ती, विद्या, बुद्धि आणि निरोगी आयुष्याची प्राप्ती होते. सूर्योदयापूर्वी चार घडी आधी ( अंदाजे दिड तास) ब्रम्ह मुहुर्तामध्ये उठणे चांगले. या वेळेत झोपणे शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे. चला जाणून घेऊया हा काळ खास का मानला जातो आणि या वेळी काय केले पाहिजे व काय नाही केले पाहिजे..

ब्रह्ममुहूर्ता काळाचे महत्त्व –


ब्रह्म मुहूर्त हा आध्यात्मिक क्रिया करण्यासाठी सर्वात योग्य वेळ मानला जातो . हा संक्रमणाचा काळ आहे आणि जेव्हा तुमचे मन निसर्गाच्या सूक्ष्म शक्तींशी सुसंगत असते. ही अशी वेळ आहे जेव्हा तुमचे मन, ब्रह्म म्हणजे देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ. म्हणजे ब्रह्म मुहूर्त (Brahama Muhurat Timing) हा देवाचा काळ आहे. या मुहूर्तामध्ये शरीरात नवीन ऊर्जा आणि उत्साह येतो. तसेच यावेळी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अधिक असतो. असे मानले जाते की ब्रह्म मुहूर्तावर सर्व देवी-देवता पृथ्वीवर येतात. अशा परिस्थितीत देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी या काळात काही विशेष काम करण्याचा सल्ला दिला जातो. त्याचबरोबर अशी काही कामे देखील शास्त्रात सांगण्यात आली आहेत.

ब्रह्ममुहूर्तात उठण्याचे फायदे –


जे लोकं ब्रह्म मुहूर्तामध्ये दररोज उठतात त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त असते. वास्तूनुसार, यावेळी संपूर्ण वातावरण सकारात्मक उर्जेने भरलेले असते आणि सकाळी उठल्यावर ही उर्जा आपल्या आतल्या उर्जेमध्ये मिसळली जाते. मग आपल्याला चांगले विचार मिळतात. मनात उमंग आणि उत्साहाची भावना असते. जेव्हा आपण या सकारात्मक उर्जासह कोणतेही कार्य करतो, तेव्हा त्यात यशस्वी होण्याची शक्यता वाढते. आयुर्वेदानुसार, ब्रह्म मुहूर्तामध्ये फेरफटका मारल्यामुळे शरीरात संजीवनी शक्तीचा संचार होतो. याच कारणास्तव वाहणार्‍या वाऱ्याला अमृतातुल्य म्हणतात. याखेरीज ही वेळ अभ्यासासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचेही म्हटले आहे. कारण जेव्हा आपण रात्री विश्रांती घेतल्यावर सकाळी उठतो तेव्हा शरीर आणि मेंदू देखील ताजे-टवटवीत राहतात.
इंटरनॅशनल जर्नल ऑफ योगा अँड अलाईड सायन्सेसच्या मते , सूर्योदयपूर्व काळात वातावरणात नवजात ऑक्सिजनची उपलब्धता असते. हा नवजात ऑक्सिजन सहजपणे हिमोग्लोबिनमध्ये मिसळून ऑक्सिहेमोग्लोबिन तयार करतो, ज्याचे खालील फायदे आहेत:
: रोगप्रतिकारशक्ती वाढवते


: ऊर्जा पातळी वाढवते


: रक्तातील पीएच समतोल राखण्यास मदत होते


: वेदना, वेदना आणि पेटके दूर करते


: खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचे शोषण वाढवते.

ब्रह्ममुहूर्त निगडित कथा –


वाल्मिकी रामायणात ब्रह्म मुहूर्ताबद्दल एक कथा सांगण्यात आली आहे. यानुसार पवनपुत्र हनुमानजींनी ब्रह्म मुहूर्तामध्येच अशोक वाटिका गाठली. जिथे त्यांनी वेद मंत्रांचे पठण केले आणि माता सीतेला ऐकवले. हे देखील शास्त्रात नमूद केले आहे…

वर्णं कीर्तिं मतिं लक्ष्मीं स्वास्थ्यमायुश्च विदन्ति।
ब्राह्मे मुहूर्ते संजाग्रच्छि वा पंकज यथा॥
म्हणजेच ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून सौंदर्य, लक्ष्मी, बुद्धिमत्ता, आरोग्य इत्यादी मिळते. असे केल्याने शरीर कमळासारखे सुंदर बनते.

ब्रह्म मुहूर्तामध्ये काय काम करू नये –


ज्योतिषशास्त्रानुसार, ब्राह्म मुहूर्तावर केर काढू नये. ब्राह्म मुहूर्त म्हणजे असा काळ, ज्यात घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत असतो. त्याच काळात केरसुणीने कचरा काढून, घरातला कचरा बाहेर टाकला, तर सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जेच रूपांतरित होऊ शकते. ब्राह्म मुहूर्तावर कचरा काढण्याची वेळ कधी आलीच, तर एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा, की या वेळेत कचरा घरातून बाहेर टाकू नये.


काही लोक ब्राह्म मुहूर्तावर उठतात आणि उठल्याबरोबर चहा नाश्ता करतात. ही सवय आरोग्यासाठी हानिकारक आहे. शिवाय उठल्याबरोबर चुकूनही जेवण करू नका. असं केल्याने तुम्हाला अनेक रोग होऊ शकतात.


ब्राह्म मुहूर्तावर माणसाचं डोकं जागृत अवस्थेत असतं. आयुष्याचे महत्वपूर्ण निर्णय घेणे, म्हत्वाच्या योजना आखणे यासाठी हा काळ महत्वाचा समजला जातो. त्यामुळे यावेळात कधीही नकारात्मक विचार करू नये. नाहीतर संपूर्ण दिवस तणावपूर्ण जातो. मानसिक आजार जडतात.

ब्रह्म मुहूर्त आणि निसर्ग यांचे संबंध अगदी जवळचे आहे. या वेळी प्राणी-पक्षी जागे होतात. त्यांचे गोड बोलणे सुरू होते. कमळाचे फूलही बहरते. कोंबडी बांग द्यायला लागते. एक प्रकारे, ब्रह्म मुहूर्तामध्येही निसर्गात चैतन्य निर्माण होते. उठणे, जागे होणे याचे हे प्रतीक आहे. निसर्ग आपल्याला संदेश देतो की, झोपेचा त्याग करून ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून रोजच्या कामांची सुरुवात करा. आपल्या जीवनशैलीत थोडासा सकारात्मक बदल करून आपण ही ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून निरोगी आणि सकारात्मक दिवसाची सुरुवात करुया….. तुम्ही रोज कधी उठतात आणि दिवसाची सुरुवात कशी करतात या वर विचार करावा. ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून होणाऱ्या फायद्याचा लाभ घ्यावा अशी आशा!!!!


तुम्हाला या लेखातून ब्रह्म मुहूर्ता बद्दल मिळालेली माहिती किती फायदेशीर वाटली हे कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *