October 4, 2024

हिवाळ्यात मऊ आणि निरोगी त्वचेसाठी तज्ञांकडून ८ सर्वोत्तम टिप्स

गुलाबी थंडीचा ऋतू म्हणजे हिवाळा!

हिवाळा सगळ्यांचं आवडतो , आपण सगळे हिवाळ्यात आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घेत असतो.  खास करून त्वचेची काळजी ही थोडी जास्तच घेत असतो.  पण आपण घेत असलेल्या सावधगिरी मध्ये आपण खूप चुका करतो . त्या करता आज जाणून घेऊया हिवाळ्यात मऊ आणि निरोगी त्वचेसाठी तज्ञां कडून 8 सर्वोत्तम टिप्स.

1: सकस आणि संतुलित आहार घेणे – हिवाळ्यात बाजारात भरपूर हंगामी फळे आणि भाज्या उपलब्ध असतात .आपल्या आहारात हंगामी फळे, पालेभाज्या यांचा समावेश करावा .जस की गाजर, मुळी, काकडी, पालक, मेथी, मोहरी, लिंबू  ई. संतुलित आहारा मुळे शरीराला आवश्यक असलेले सगळे व्हिटॅमिन पूरक प्रमाणात भेटतात त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि निरोगी राहण्यास मदत होते.

2: पुरेश्या प्रमाणात पाणी घेणे – कुठला ही ऋतू असू द्या आपल्या शरीराला पुरेश्या पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यात आपण भरपूर प्रमाणात पाणी घेतो पण हिवाळ्यात वातावरण थंड असल्याने पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहतं नाही .यामुळे हिवाळ्यात त्वचा कोरडी होते आणि त्वचेचा ग्लो कमी होतो.

3: त्वचेच्या स्वच्छतेची काळजी घेणे – हिवाळ्यात त्वचेच्या स्वच्छतेची नियमित काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे जसे आपण उन्हाळ्यात घेत असतो. अंघोळीला जास्त गरम पाणी वापरू नये, त्यामुळे आपली त्वचा कोरडी होऊ शकते. दिवसातून 3- 4 वेळा चेहरा स्वच्छ धुणे.

4: साबणाचा वापर कमी करावा – हिवाळ्यात नेहमी प्रमाणे अंघोळीसाठी साबण वापरणं कमी करावे . साबणाचा जास्त वापर केल्याने त्वचेतील ओलावा कमी होतो आणि त्वचा लवकर कोरडी पडते. तुमची त्वचा कोरडी असेल तर स्क्रबचा वापर अजिबात करू नये ; मात्र तेली त्वचा असेल तर स्क्रब आवर्जून वापरावे त्यामुळे त्वचेतील तेल कमी होण्यास मदत होते.

5: योग्य स्किन केअर उत्पादकांचा वापर करणे – आजकाल बाजारात भरपूर नवनवीन स्किन केअर उत्पादके उपलब्ध आहेत . शक्यतो नैसर्गिक किंवा सेंद्रिय( organic) उत्पादकांचा वापर करावा. केमिकल युक्त स्किन केअर उत्पादक टाळावे . पराबीन मुक्त स्किन क्रीम वापरावी. घरगुती पदार्थ वापरणे जास्त फायदेशीर असते जसे की दूध, दुधाची साय , मध , कोरपड, इत्यादी.

6: मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरणे – हिवाळ्यात व्हिटॅमिन ई मॉइश्चरायझरचा वापर करावा . दिवसा घराबाहेर पडताना सूर्यकिरणे त्वचेसाठी हानिकारक असतात त्यामुळे SPF सनस्क्रीन वापरावे.

7: ओठांची काळजी घेणे- हिवाळ्यात ओठांची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात ओठ जास्त कोरडे पडतात आणि फाटतात त्यामुळे ओठातून रक्तस्त्राव होतो. याकरिता SPF LIP BALM वापरणे जास्त फायदेशीर आहे.

8: मादक पदार्थांचे सेवन टाळावे – हिवाळ्यात मादक पदार्थांचे सेवन करणे टाळावे, अल्कोहोल सेवन करणे पण टाळावे . होईल तेवढा पौष्टिक आहार घ्यावा जेणेकरून  आपले शरीर आणि  त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

हिवाळ्यात बराच वेळा त्वचेतील ओलावा कमी झाल्यामुळे त्वचेचे आजार संभवतात त्यामुळे हिवाळ्यात योग्य ती काळजी घ्यावी आणि वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.

तुम्हाला हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या “contentstudioo” या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा. – https://whatsapp.com/channel/0029VaPJjO29MF8v8LOcVA1H

स्वाती बोरसे,

वडोदरा गुजरात

One thought on “हिवाळ्यात मऊ आणि निरोगी त्वचेसाठी तज्ञांकडून ८ सर्वोत्तम टिप्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *