आज एकादशी आहे. आपल्या कडे उपासाच्या दिवशी भगर सेवन करतात.भगरी बद्दल जाणून घ्या।
भगर म्हणजेच ‘वरीचे तांदूळ’ हे आपल्या घरी उपासाच्या दिवशी केले जातात.
सहसा उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही.
पण या भगरीत काय काय घटक आहेत आणि ती किती पौष्टिक आहे हे वाचले तर असे लक्षात येईल की एरवी सुद्धा खायला हा पदार्थ किती चांगला आहे.
आज आपण याच उपासाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.