December 21, 2024

मुलांचा स्क्रीन टाईम कसा कमी करायवा ?

सध्याच्या डिजिटल ( digital ) युगात दर पालकांना सतावणारा सगळ्यात मोठा प्रश्न आणि तो म्हणजे “मुलांचा स्क्रीन टाईम कसा कमी करायवा ?” या प्रश्ननाने तुम्ही पण त्रासले आहात का ??चला तर मग आज जाणून घेऊया काय करावे आणि कसे नियंत्रित करावे मुलांचे वाढलेल्या स्क्रीन टाईम चे वेड……

मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ हा पालकांसाठी अतिशय काळजीचा विषय असतो; पण जिथे पालकांनाच इंटरनेट वापरा संदर्भात बंधनं नको असतात, तिथे ती लहान मुलांना का हवीशी वाटतील? सध्या तर मुल आपल्या घरातले मोठे जे काही या जस करतात त्यांना पण तेच अनुकरण करायचे असते . मुलांना लागणारी प्रत्येक सवय ही घरातील मोठ्यांपासून लागते हे पण तितकं खर आहे….. मुलांपर्यंत काय पोेचतं, कसं पोेचतं, यावर पालकांना वाटतं तितकं त्यांचं नियंत्रण आज नाही. शिवाय स्मार्टफोनच्या बाबतीत मुलं पालकांचंच अनुकरण करत असतात. पालकांच्या इंटरनेटच्या आणि स्मार्टफोन वापराच्या सवयी ज्या आणि जशा आहेत, त्यांचा प्रभाव मुलांवर पडतोच. त्यातून ‘गेमिंग अ‍ॅडिक्शन’ जसं मोठ्यांमध्ये असतं, तसंच मुलांमध्ये दिसायला लागतं; फरक फक्त कुठले गेम्स खेळले जातात, याचा असतो. हा प्रश्न सोडवायचा कसा, हा सगळ्यात मोठा प्रश्न पालकांच्या समोर आज आहे. तो सोडवण्यासाठी मुळात काही मुद्द्यांचा विचार करणं गरजेचं आहे…. आज जाणून घेवूया कोणते मुद्दे आहेत ते….

स्वीकार आणि समजून घेणे

डिजिटल क्रांती युगात इंटरनेट, सोशल मिडिया आणि स्मार्टफोन हे अगदी रोजच्या जीवनशैली चे अविभाज्य घटक आहेत. आताच्या मुलांना या डिजिटल क्रांतीला त्यांच्या जीवनात सोबत घेऊनच चालावे लागणार आहे या गोष्टीचा आताच्या पालकांनी आवर्जून स्वीकार करायलाच हवा. अनेकदा पालकांना मानसिक पातळीवर या गोष्टीचा स्वीकार नसतो; त्यामुळे मुलांच्या आयुष्यातलं आभासी जग त्यांना आवडत नाही, झेपत नाही. आपल्यापेक्षा वेगळं जगणार्‍या मुलांशी जीवनशैलीवरून त्यांची भांडणं होतात. तंत्रज्ञानाशी किंवा तंत्रज्ञानाविषयी मुलांशी भांडून प्रश्न सुटणार नाही.काही गोष्टी या कायमस्वरुपी असणार आहेत, याचा स्वीकार गरजेचा आहे. ह्या बाबी पालकांनी समजून घेणे तितकेच गरजेचे आहे.

नियम पालन सर्वांना लागू !!

सगळे नियम फक्त आपल्या मुलांसाठी आहेत आणि ते नियम राबवून आपण मुलांना योग्य वळण आणि शिस्त लावतो, या भ्रमातून पालकांनी लवकरात लवकर बाहेर पडायला पाहिजे. इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडिया वापरा संदर्भात जर काही नियम असतील तर ते सगळ्या घरासाठी हवेत .आपण पालक आहोत, म्हणून या नियमातून सुटका करवून घेणं योग्य नाही. मुलांना शिस्त लावण्याआधी स्वतःला शिस्त लावली पाहिजे. जर तुमचा सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा वापर मुलांना आकर्षणाचे केंद्र बिंदू वाटू लागतो त्यामुळे मुलांना स्मार्टफोन आणि ‘इंटरनेट डिपेन्डन्सी’ या सवयी मुल नकळत त्यांच्या रोजच्या जीवनशैली अवगत करतात आणि त्यांची जीवनशैली पण बदल जाते हे लक्षात घ्या.!!!!


पालक म्हणून सगळेच काहीसे दुतोंडीच असतात. दाखवायचं एक अन् वागायचं एक, हे पालक होण्यातलं मूलभूत कौशल्य असतं अनेकदा; पण या विषयाच्या बाबतीत जरा वेगळा विचार केला पाहिजे. मुलांनी ‘अमुक-तमुक’ करायचं नाही.आणि आपण मात्र तेच ‘अमुक-तमुक’ मुलांसमोर करणार, असं चालणार नाही. पालक इंटरनेट आणि गॅझेट्स कशी वापरतात, याकडे मुलांचं बारीक लक्ष असतं. आपण मोबाईल वापरतो; तेव्हा तो फक्त कामासाठी असतो आणि मुलं मोबाईल वापरतात, तेव्हा ती टाइमपास करत असतात, हे एक ‘असत्य’ आपण पालकांनी स्वतःला सांगितलेलं आहे. स्वतःबरोबर मुलांनाही ते पटवून देण्याचा आपला आटोकाट प्रयत्न असतो. कारण पालक म्हणून ती आपली सोय असते; तुम्ही किती खरं सांगताय आणि किती खोटं सांगताय, हे मुलांना पक्कं माहीत असतं. ते पालकांसमोर बोलून दाखवत नाहीत, इतकंच.

जीवनशैलीतली बदल गरजेचे !

आधीच्या काळात सकाळी उठल्यावर आधी करपुजा, भूमिपूजन करून दिवसाची सुरुवात करायचे . पण आताच्या काळात अनेक पालकांना सकाळी उठल्या-उठल्या आधी मोबाईल बघायची सवय असते किंवा सतत दर पाच-दहा मिनिटांनी मोबाईल चेक करण्याची सवय असते. जरा ‘रेंज’ मिळत नसेल, तर काही पालक अवस्थ होतात. काही पालक सतत ‘सेल्फी’ काढत ‘इंस्टा’वर ‘अपलोड’ करत असतात. काही पालक तिथे मिळणार्‍या ‘लाईक्स’ना आणि ‘कमेंट्स’ना बघून खूष होत असतात. त्यांच्या या आनंदी होण्यात व्यत्यय आला, तर ते चिडतात. काही पालक ऑफिसमधनं घरी आले की मुलांशी बोलण्याआधी फोनमध्ये डोकं घालतात. काही पालक मुलांना जेऊ घालताना त्यांना टीव्ही लावून देतात आणि स्वतः ‘व्हॉट्सअ‍ॅप’मध्ये किंवा ‘सोशल मीडिया’त डोकं घालून बसतात. काही पालक मुलांना झोपवताना एका हातानं थोपटतात, तर दुसर्‍या हातानं मेसेजेस चेक करत असतात. काही पालक ट्रिपला गेल्यावर प्रवासात बहुतेक सगळा वेळ स्वतःच्या स्मार्टफोनवर काही-बाही बघत असतात. काही पालक सतत कुणाशी तरी ‘गॉसिपिंग’ करत असतात… यादी अजूनही बरीच मोठी निघेल. हे सगळं मुलांसमोर चालू असतं. मुलं ते बघत असतात. त्यांना जे-जे आणि जितकं समजतंय, त्यानुसार ती त्या सवयी उचलत असतात. जिथे आई-बाबांना त्यांच्या सवयी सोडता येत नाहीत, तिथे मुलांना त्या चटकन कशा सोडता येणार? सवयी बदलणं म्हणजेच जीवनशैलीत मूलभूत बदल करणं असतं, हे समजून घेतलं पाहिजे.

जाणून घ्या तंत्रज्ञान शत्रू की मित्र –

आपण सध्या ज्या डिजिटल तंत्रज्ञान युगात जगतो आहे हे आपल्या साठी मित्र नाही की शत्रू नाही .आपलं त्याच्याशी भांडण नाही. आपल्या मुलांना आणि आपल्यालाही इंटरनेट/सोशल मीडिया/गेमिंग यांचं व्यसन लागू नये, असं वाटत असेल, तर आपलं जगणं इंटरेस्टिंग कसं होईल, हे बघायला हवं. मुलांनी स्मार्टफोनमध्ये अडकू नये, असं वाटत असेल तर मुलांना आपल्याशी सहज ‘कनेक्ट’ कसं होता येईल, हे पालकांनी बघायला हवं… म्हणजेच मुलांशी बोलायला हवं आणि हा संवाद म्हणजे मुलांचं बौद्धिक घेणं; शाळा घेणं नाही. तर सहज मैत्रीपूर्ण संवाद. मुलांबरोबर एकत्र वेळ घालवायला हवा.उगाचच गप्पा, कुठलाही अजेंडा न ठेवता मारलेल्या गप्पा, केलेली भटकंती या गोष्टी मुलांशी ‘कनेक्ट’ होण्यासाठी सगळ्यात जास्त गरजेच्या असतात. ऑफिसमधून आल्यावर दमलोय म्हणून फोनमध्ये डोकं खुपसण्यापेक्षा मुलांशी बोला. त्यांचा दिवस कसा गेला, ते विचारा. टेन्शन काही फक्त पालकांच्या आयुष्यात नाही, ते मुलांनाही येतं. एकमेकांशी बोलून ते कमी होतं.

स्क्रीन टाईम मॅनेजमेंट

स्क्रीन म्हणजे फक्त मोबाईल ची या लॅपटॉप ची स्क्रीन नव्हे !!! सगळ्यात मोठ व्यसन मुलांना टेलिव्हिजन स्क्रीन देखील आहे .अगदी 1 वर्षाच्या मुलांना देखील खाताना मोबाईल चालू करून द्यावा लागतो …. आणि कसा आहे ना गेल्या 2 -3 वर्षा पासून कोरोना महामारीनंतर आपण सगळेच घरात अडकलो होतो. बाहेर पडता येत नाही, ‘सोशलायझिंग’ करता येत नाही. याचा परिणाम आपला ‘स्क्रीन टाईम’ वाढण्यावर नक्कीच झाला आहे. मुलांच्या बाबतीत सांगायचं तर शाळा ऑनलाईन, क्लासेस ऑनलाईन, एंटरटेनमेंट ऑनलाईन, टाईमपास ऑनलाईन; अगदी वाढदिवसही ऑनलाईन अशी परिस्थिती ओढवली होती आपल्या सगळ्यांवर त्यामुळे आपण मोठ्यानं पासून लहान मुलं पर्यंत सगळ्यांचीच स्क्रीन टिमिंग खूपच वाढली .ऑफिस ची काम तर ऑनलाईन होताच पण आता तर मनोरंजन पण ऑनलाइन आहे.‘ओटीटी अ‍ॅडिक्शन’ ही एक नवी समस्या मोठ्यांच्या संदर्भात दिसायला लागली आहे. अशात ‘स्क्रीन डिपेन्डन्सी डिसऑर्डर’पासून आपण मोठ्यांनी तर वाचायचं आहेच; पण आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना वाचवायचं असेल, तर ‘स्क्रीन टाईम मॅनेजमेंट’शिवाय पर्याय नाही.

चांगला आणि वाईट स्क्रीन टाईम समजून घेऊ –

तुमचा मोबाईल, टॅब, लॅपटॉप आणि टीव्ही यांचा एकूण वापर मिळून तुमचा दिवसाचा स्क्रीन टाईम ठरतो. त्यामुळे तो किती असावा, असा विचार जेव्हा कराल, तेव्हा या सगळ्यांचा एकत्रित विचार करा.


स्क्रीन टाईम मॅनेजमेंट करताना एकावेळी एक पाऊल, एक उद्दिष्ट, एक ध्येय ठेवलं पाहिजे. ते पूर्ण केल्यावर पुढचं टार्गेट. असं केल्यामुळे स्क्रीन टाईम कमी करण्याचं दडपण येत नाही आणि आपण सहजपणे बदल स्वीकारू शकतो.


ज्या वेळी तुम्हाला तुमचा फोन बाजूला ठेववत नाही, फोन न घेता चुकून घराबाहेर पडलात तर अस्वस्थ वाटतं, दर थोड्या वेळानं फोन चेक करावासा वाटतो, सोशल मीडियावर सतत जाण्याचा मोह होतो, फोन बंद करायला सांगितला तर तुम्हाला राग येतो, चिडचिड होते, याचा अर्थ तुमचा किंवा तुमच्या मुलांचा प्रवास मोबाईल डिपेन्डन्सीकडे सुरू झालेला आहे.


इंटरनेटवर गेल्यानंतर काय वाटतं? का जावंसं वाटतं? गेलं नाही तर काय वाटतं? तिथे असणारे धोके मुलांना सांगितले पाहिजेत. त्याचा मनावर-मेंदूवर होणारा परिणाम सांगितला पाहिजे आणि स्क्रीन टाईम मॅनेजमेंट का गरजेचे आहे, याविषयी कुटुंबामध्ये संवाद झाला पाहिजे.

मुलांच्या स्मार्ट फोन वापराच्या बाबतीत काही नियम बनवा. ते काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करा. जसे की मुलांचा फोन रात्री अमुक एका वेळेनंतर बंद झालाच पाहिजे.
सायबर गुन्ह्यांविषयी आणि धोक्यांविषयी मुलांशी बोला. सायबर जगात अनोळखी लोक त्यांना टार्गेट करू शकतात, समवयीन बुली करू शकतात, खोटी प्रोफाईल्स वापरून गुन्हेगार सायबर जगात फिरत असतात, हे सांगा.

नो स्क्रीन डे’ किंवा ‘डिजिटल डिटॉक्स’ करा. महिन्यातून, पंधरा दिवसांतून, आठवड्यातून… तुमच्या सोयीनं एक दिवस ‘नो स्क्रीन डे’ करा.अगदी टेलिव्हिजन स्क्रीन देखील नाही .’नो डिजिटल स्क्रीन उपवास ‘आहे असा एक दिवस साजरा करा. त्या तुम्ही ऐवजी इनडोअर आणि आऊटडोअर खेळ मुलांबरोबर खेळा म्हणजे मुल शारिरीक आणि मानसिक दृष्या healthy बनतील.
लहान वयात स्मार्ट फोन वापरायला मिळणं हे प्रिव्हिलेज आहे, याची कल्पना मुलांना द्यायला हवी. पालक आणि मुलांनी इंटरनेट, गॅझेट्स या सुविधांच्या पाठोपाठ येणारी जबाबदारीही स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. आभासी जगात वावरणं, स्मार्ट फोन योग्य पद्धतीनं वापरणं, ही जबाबदारी आहे, हेही मुलांना समजावून सांगा.


उन्हाळी सुट्टी मध्ये मुलांचा स्क्रीन टाईम कमी करायचा असेल तर मुलांबरोबर पालकांनी देखील मुलांबरोबर outdoor, indoor खेळ खेळावे, मुलांचा छंद ओळखून त्यांना त्यांचा छंद जोपासण्यासाठी प्रोहत्सन द्यावे..


स्क्रीन टाईम मॅनेजमेंट ही एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही. सातत्याने आणि दीर्घकाळ यासाठी आपल्याला प्रयत्न करत राहावे लागणार आहेत.


तुम्ही तुमच्या मुलांच स्क्रीन टाईम मॅनेजमेंट कसा करतात हे कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा …
तुम्हाला आमचा लेख तुमच्या मुलांच स्क्रीन टाईम कमी करायला नक्की मदत करेल ….
धन्यवाद .

स्वाती बोरसे,
वडोदरा गुजरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *