December 21, 2024

गैरसमज टाळण्यासाठी काय करावे??

घर म्हटलं की भांड्याला भांड लागणारच !!!!


बरेच वेळा ऐकल असेल ना तुम्ही !!!!!. पहिले गैरसमज हे फक्त घरातील माणसं मध्ये असायचे. आणि त्यामुळे घरात वादविवाद , भांडणे होत असे पण आता गैरसमज हा प्रकार थोडा विलक्षण झाला आहे. मोठ्यांनी एकमेकांबद्दल गैरसमज वाढवून नात्यानं मध्ये तेढ निर्माण होणं हे आपण सगळ्यांनी अनुभवला असेलच पण कधी असा विचार केला आहे का गैरसमज टाळण्यासाठी आपण काय काय करू शकतो ?? आपल्यात असा कोणता बदल घडवला तर आपल्यामुळे नात्यात आलेली तेढ कशी कमी होऊ शकते??


विचार करा …. आज आपण जाणून घेऊया काय आणि कसे वागावे अथवा स्वतः त काय बदल करावे?

कोणत्याही नात्यात मानवां मधील गैरसमज केवळ पालक-मुलांच्या नाते संबंधां पुरते मर्यादित नाहीत. हे मित्र, सहकारी आणि अगदी रोमँटिक भागीदारांसह कोणत्याही नातेसंबंधात होऊ शकते. बर्‍याच प्रकरणांमध्ये, प्रभावी संवादाचा अभाव, भिन्न दृष्टिकोन आणि सांस्कृतिक किंवा वैयक्तिक मतभेदांमुळे गैरसमज उद्भवतात. यामुळे संघर्ष, तणावपूर्ण नातेसंबंध आणि ब्रेकअप देखील होवू शकतात. कामाच्या ठिकाणी, गैरसमजांमुळे कामावर परिणाम होतो. उत्पादकता कमी होते, मनोबल कमी होते आणि कायदेशीर समस्या देखील उद्भवू शकतात.

कसे टाळावे आणि काय करावे –

काही प्रकरणांमध्ये, गैरसमजांचे दीर्घकाळ टिकणारे परिणाम होऊ शकतात. ज्यांचे निराकरण करणे कठीण आहे. म्हणूनच ते टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, विशेषतः वृद्धांची.( घरातील मोठ्या माणसांची ) .आपल्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्यांना समजून घेणे गरजेचे आहे त्यामुळे genration gap मध्ये असलेले गैरसमज टाळण्यासाठी मदत होते.

काळजीपूर्वक संवाद साधा –


समोरच्याचे बोलणे काळजीपूर्वक, हळूवारपणे आणि समजून घ्या . नंतर त्यावर तुमची मते हळुवार मांडा; मग ते स्पष्ट आहे की नाही ते समोरच्याला विचारा. आपल्या विचारानं प्रमाणे समोरच्याचे विचार सहमत आहेत की नाही याची दक्षता ठेवा . आपल्या संवादने समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखवल्या जाणार नाही याची काळजी घ्या. सध्या बरेच गैरसमज अंतर्गत इगो दुखावल्या मुळेच जास्त निर्माण होतात आणि त्यामुळे नात्यात तेढ निर्माण होते .

अगदी शांतपणे ऐका –


बोलण्यात जितकी काळजी घेतली पाहिजे तितकीच ऐकण्यात शांतता असावी. समोरची व्यक्ती काय सांगते आहे हे शांताते ऐकणे आणि समजणे आवश्यक असते. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यात कमीपणा शोधण्या आधी त्यांच्या विचारांना समजून घ्या. आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवा त्याने बरेच गैरसमज दूर होतात.

नाराज न होता विरोधी मत ऐका –


जर तुम्ही तुमच्या तत्वज्ञानापेक्षा अजिबात भिन्न मते ऐकू शकत नसाल तर गोष्टी बिघडू शकतात. म्हणूनच, गैरसमज टाळण्यासाठी आणि मजबूत आणि सकारात्मक नातेसंबंध निर्माण करण्यासाठी प्रभावी संवाद, पारदर्शकता आणि परस्पर समंजसपणा महत्त्वाचा आहे.

डिजिटल गैरसमज टाळण्यासाठी उपाय –


आताच्या काळात गैरसमज आणि नात्यातील तेढ ही केवळ फक्त समोरासमोर तोंडा पुरती नसून तर ती आता डिजिटल तंत्रज्ञानी झाली आहे . मोबाईल द्वारे मेसेज मधून , स्टेटस् माध्यमातून आजकाल नातेवाईक एकमेकांना कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे लोकांचा एकमेकांबद्दल गैरसमज अजूनच वाढत जातो ; त्या करता मोबाईल फोन माध्यमातून तरी आपण कोणाला दुखवले जाणार नाही असे मेसेज करणे टाळावे. आपल्या माधले सकारात्मक विचार सगळ्यांना पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा.

दृष्टिकोनात बदल करावे –


आपल्या दृष्टी पेक्षा दृष्टिकोन बदलणे सध्याच्या काळाची गरज आहे. सकारात्मक दृष्टिकोन असेल तर विचार आणि आचरण पण सकारात्मक बनेल आणि परिणामी नातेसंबंध दृढ होतील. इतर व्यक्तीच्या दृष्टीकोनातून गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करा. अधिक सकारात्मक संवादाचे वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांच्या भावना आणि चिंता मान्य करा.

संवाद द्विमार्गी असावा-


जेव्हा तुम्ही कोणा बरोबर संवाद साधत असतात त्या वेळी संवाद हा एक तर्फी नसून द्विमार्गी असवा. त्यामुळे समोरच्या व्यक्ती बरोबर आपले विचार आणि मत जुळता आहेत की नाही याची कल्पना आपल्याला येते. तुमच्या संवादात नेहमी नम्रता आणि आदर असवा . उग्र भाषेचा वापर करून मांडलेले विचार आणि मत बरोबर असेल तरी त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात नकळत गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्याच करता आपले मोठे नेहमी बोलतात ;
“पाणी आणि वानी जरा जपून वापरावी”


आपल्या वाणी वर नियंत्रण असेल तर आपल्याला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक अडचणी कधीच उद्भवत नाही.

नातेसंबंध टिकविण्याचा प्रयत्न करावे –


पालक – मुलांमध्ये गैरसमज होणे ही आजची नवीन बाब नाही पूर्वी पासून generation gap असल्या मुळे मते न जुळणे हे आपल्याला माहितीच आहे ; तरी सुद्धा पालक आणि मुले दोघी एकमेकांच्या नातेसंबंधना सांभाळून घेतात. पण हे समीकरण नव विवाहित जोडी ने स्वाकरवे ; आताच्या पिढीत एकमेकांना न समजून घेता एकमेकांमध्ये छोट्या छोट्या गोष्टी वरून गैरसमज वाढणे खूप वाढले आहे. या साठी घरातील मोठ्या माणसांनी पुढाकार घेऊन आताच्या पिढीला नाते टिकवणे शिकवावे . समज – गैरसमज चे धडे वेळोवेळी द्यावे. त्यांना असलेले अनुभव आताच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल हे मात्र नक्की.

आपल्या जीवनात छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये गैरसमज होऊ देऊ नका. कारण ते वाढतच जातात आणि दुर्घटना किंवा अपघाताचे कारण बनू शकतात. आजच प्रण घ्या आणि यापूर्वी तुमचे कोणा बरोबर असलेले गैरसमज मोडून नवीन नात निर्माण करा. या पुढे गैरसमज हा शब्द तुमच्या शब्दकोश मधून काढून टाका .


आपली माणस , आपली नाती खूप अनमोल ठेवा आहे ; त्यांना आपल्या जीवनात नेहमी जपून ठेवा. नात्यात एकदा का तेढ आली की ती आयुष्य भर तुटलेल्या दोरीच्या गाठीच काम करते ; वेळी वेळी ती तिढ आपल्याला तुटलेल्या नातेसंबंधांची ओळख करून देत असते……

समाज – गैरसमज का आणि कश्या मुळे होतात हे जाणून घ्या.आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना गैरसमजामुळे तुटणारी नाती आणि उद्ध्वस्त होणारे नवे संसार या पासून सावध करा . तुम्ही वरील सांगितलेल्या माहिती नुसार समंजस पणे वर्तन करताच असाल पण तुमच्या आजूबाजूला कोणा मध्ये थोडा तरी बदल घडवा असे वाटत असेल तर ही माहिती नक्की त्यांना शेअर करा . आणि तुम्हाला अजून काय बदल केल्याने गैरसमज टाळण्यास मदत होईल असे वाटत असेल तर ते कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *