July 17, 2025
सवाष्ण(भयकथा)

सवाष्ण (भयकथा)

सवाष्ण(भयकथा)


रात्रीची वेळ,अंगण झाडताना होतो अगदी तसाच,
खराट्याचा आवाज…


एवढ्या रात्री कोण अंगण झाडत असेल…??
मी खिडकीतून बाहेर बघितले.कुणीही नव्हते.
आवाज मात्र येतच राहिला..


एक मरतुकडे कुत्रे कोपऱ्यात शेपटी गुंडाळून बसलेले.
ते अचानक कुणी पेकटात लाथ घालावी तसे रडायला लागले.
ते रडणे करूण पेक्षाही भितीदायक होते.


असे वाटत होते कोणत्यातरी अदभुत शक्तीचा तिथे वास असावा.

आम्ही शनिवार रविवार जोडून कोकणात आलो होतो.
हाॅटेलला खर्च नको म्हणून वाडीतच एक रूम मिळाली होती.
अगदी स्वस्तात म्हणून इथे राहिलो होतो.वाडी सगळी शांत झोपली
होती.थंडीचे दिवस होते.हवेत गारठा चांगलाच जाणवत होता.
आता खराट्याचा आवाज अगदी जवळून ऐकू यायला लागला.
मी परत हळूच खिडकीचा पडदा किंचित बाजुला करून बघितले,तर,
खराटा एकटाच अधातरी कुणीतरी पकडल्या सारखा फिरत होता.
तिथे कुणीही नव्हते…ते मरतुकडे कुत्रे आता लांब जाऊन खराट्याच्या दिशेने बघून करूण आवाजात रडायला लागले.
मी पटकन उठून बेडवर आडवी झाले.पांघरूणात स्वत:ला गुंडाळून
घेतले..आता मला सेफ वाटत होते.पण खिडकी उघडीच राहिली…

मी पांघरूणातुन चोरून खिडकीकडे बघत होते…खिडकीवर टकटक
झाली.मी श्वास रोखून बघत होते.कीतीतरी वेळ भयाण शांतता होती.
तरी मी खिडकीकडे बघतच होते..आता दाराजवळ पावले वाजली.
को असेल..??
पालापाचोळा उडतोय,वारा सुटलाय असा आवाज..
दारावर एकच एक सणसणीत थाप पडली.माझा नवरा उठून बसला.
मी पटकन त्यांना आवाज करू नका बोलले…
पण
माझा नवरा डाॅक्टर आहे..डॅशिंग आहे..
“. काय बावळटपणा चाललाय तुझा..??? दरवाजा वाजला नं??? “
” अहो दरवाजा उघडू नका.रात्रीची वेळ आहे.आपण परक्या गावात
आहोत..कोण असेल देव जाणे…!!!

आणि
दरवाजातून आरपार एक सावली समोर आली…फक्त आवाज

” मी सवाष्ण आहे…ही जागा माझी आहे इथून चालते व्हा…”

हे कोण होतं दिसत नव्हते.फक्त सावली…सर्व खोली गारठ्याने भरून
गेली…एक जळलेल्या प्रेताचा वास त्या खोलीत भरून राहिला…
दार आपोआपच उघडले…

चला चालते व्हा…”

एका स्रीचा आवाज…मी तर गारठ्याने,भीतीने थरथरत होते.शब्दच
फुटत नव्हता.. साक्षात मृत्यू समोर होता…पण अहो ताडकन उभे राहिले…आणि मला ओढतच घेऊन बाहेर आले.. वळून बघितले
तर त्या खोलीला कुलूप होते.आमचे सामान आतच…म्हणून मालकांच्या
घराकडे वळलो तर कुणीतरी माझ्या नवऱ्याला लांब उचलून फेकून दिले.
मी धावत धावत… बाहेर आले..वळून बघीतले तर. हिरवे लेणे ल्यालेली
एक सवाष्ण कुंकवाचा टिळा लावलेला …तीच खराट्याने झाडत होती.
खराटा हवेत होता…तिचे पाय उलटे होते…

आम्ही रात्र बसस्टँड वर काढली सकाळी उन्हे आल्यावर परत आलो.
मालकांना घडला प्रकार सांगितला.ते काहीच बोलले नाहीत.आम्ही
आमच्या बॅगा घेऊन निघालो…

बसस्टॉपवर आल्यावर टपरीवर चहा घेतला.आमचा अनुभव ऐकून
टपरीवाला बोलला..तो मालक आहे त्याची काकी भुत झाली आहे.
याने तिची जागा हडप केली त्यामुळे ती त्या जागेत कुणालाही राहू
देत नाही.बाई विश्वास असेल तर एक ओटी जागेवर ठेवून जा…

आम्ही घरी आलो…मला सणकून ताप भरला होता.कशानेच कमी
येईना…हाॅस्पीटलला ॲडमिट झाले.
ताप थांबतच नव्हता…हाॅस्पीटलच्या आयापाशी मी बोलले होते.
डाॅक्टरांचा कशशावर विश्वास नसतो.म्हणून ती एकटीच दर्ग्यात गेली.

पीरबाबांनी पण त्या जागेवर ओटी ठेवायला सांगितले जसे त्या टपरीवाल्याने सांगितले होते.

मला उतार पडतच नव्हता..शेवटी मी आयाला ओटी आणुन ठेव सांगितले…बघू कुणाबरोबर तरी पाठवता येईल..
पण
त्या रात्री…
मी झोपले होते..मधूनच जागी होत होते.सलाईन लावले होते.
मीअर्धवट जागी होते.. मधुन नर्स सलाईन चेक करत होती.
आणि
अंधारात हालचाल जाणवली…एक सावली समोर हळूहळू आली
आयानेशेल्फमध्ये ठेवलेली ओटी घेतली…
मी बोलले…
कोण आहे…???

मी सवाष्ण आहे…आणि. ती सावली अदृश्य झाली…
मला ग्लानीत काही समजेनासे झाले होते.

सकाळी डाॅक्टर आले….

अरे वा…!!कालचे बदललेले इंजेक्शन मुळे पेशंट बरा झाला.
आज ताप नाही…
मला अतिशय घाम आला होता…आया मला टाॅवेलने पुसत विचारत होती

” ओटी कुठाय…”

” रात्री कुणीतरी आलं होतं..”

” बापरे…!!!वहिनी तरीच ताप उतरला..”

” हो गंं..”

मला खरतर अंगावर काटा आला….ते शब्द कानात घुमत होते.
मी सवाष्ण आहे…
शेवटी ती ओटी घेऊन गेली…

समाप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *