हो हो कळवते उद्या तुम्हाला असा बोलून उमा ने फोन ठेवला .नेटकीच दुपारची सगळी काम आवरून मोबाईल हातात घेतला होता उमाने .वर्क फ्रॉम होम च्या बारश्या ऍड सोशल मीडिया वर रोजच पाहत होती उमा मग काय तिलापन असा वाटलं दुपारच्या रिकाम्या वेळात झोप काढण्या पेक्षा आपण पण काही तरी करावं तेवढाच आपला financially घराला हातभार ; त्या साठीच तिला आलेला हा कॉल…….
तुम्हाला प्रश्न पडला असेल उमा म्हणजे कोण? तर एक” हाऊसवाइफ” बरोबर; नाही हो आमची उमा ही एक well educated high qualification holder bank officer आहे; पण कसा आहे ना मुलं लहान आहेत ना तिची त्यामुळे जॉब सध्या सोडला तिने आणि आई च मातृत्व जगते आहे .घरात तसे सासू सासरे असतात , उमाला 2 अपत्य आहेत मोठी मुलगी 5th std ची आणि मुलगा 10 महिन्याचा . उमाचा नवरा पण खूप qualified person आहे चांगला लाखो चा पॅकेज आहे त्याला , तसा घर एकदम समृद्ध आणि संपन्न आहे हो …
आपली उमा खूप हुशार आणि चंचल हो सगळी सनोत्सव , कुलधर्म, कुलाचार , गौरी गणपती,नवरात्र, दिवळी सगळं एकदम उत्साह आणि आनंदात करते .अचानक चार पाहुणे पण आले ना घरी तरी जरा ही कंटाळा नाही हो उमाला ! सासू उमाची ही आपल्या सगळ्यानं सारखीच😌 बोलायला आधी, खायला मधी आणि कामाला कधी मधी😄😄😄😄 …असो गंमत केली थोडक्यात उमची सासू ही सासू पणा निभावण्यात परिपक्व ;सासरे त्यांचा मोबाईल , पेपर आणि पुस्तक यात रमलेले ..
अगं उमा~~ सासूबाईंनी उमाला आवाज देताच उमा उभी झाली.
काय झालं आई ?उमा ने विचारले
आज त्या देशपांडे मावशी येणार आहेत आपल्या कडे तर थोडा चहा टाकते का त्या आल्यावर ? असा बोलून सासू बाई झोपळ्या वर बसल्या
हो हो आई करते काही टेन्शन घेऊ नका थोडा चिवडा शेव देऊ का मावशी आल्या वर?? उमा ने विचारले
नको नको लाडू दे बेसनाचा… दात नाही ना त्यांना शेव खायला ….लगेच सासूबाईंनी प्रतिउत्तर दिल.
आलेले पाहुणे परतले , संध्याकाळचा चहा , नाश्ता पण अवरले उमा ची मुलगी ट्युशन ला गेली आणि मुलगा मस्त तयार होऊन आजोबांन जवळ खेळत होता
आता देवाला दिवे लाऊन उमा रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती .नवरोबा घरी आले ,फ्रेश होऊन चहा घेत उमा असा आवाज दिला.
आज काय आहे डिनर मध्ये ? माधव ने उमाला विचारले
खिचडी आणि कढी …असा बोलून उमा ने खिचडीचा कूकर उघडला.
जेवण झाली , सगळं आवरून मुलांना झोपवत उमा ने माधव जवळ वर्क फ्रॉम होम चा विषय घेतला…..
माधव मी सोशल मिडिया वरून वर्क फ्रॉम होम करायचं असा ठरवलं आहे . दुपारच्या रिकाम्या वेळात काहीतरी करावं असं वाटतं मला आता . अथर्व मोठा झाला की परत जॉब स्टार्ट करेल पण तो पर्यंत वर्क फ्रॉम होम करावं असा म्हणते मी…..
अगं उमा तू रोज तर वर्क फ्रॉम होम करतेच की ते पण किती जोशात ,आई, बाबा, मुलं आणि माझ पण तू किती आनंदात सगळं करते. घर अगदी स्वच्छ , नीटनेटक , सुशोभित ठेवतेस . कधी आमची टीचर, कधी doctor, कधी आमची caretaker बनतेस . रोज तू आमच्या साठी सगळ्या भूमिका अगादी चोख निभावतेस ते पण तुझ्या हसऱ्या चेहऱ्याने…….
नीट विचार कर तू आजच्या घडी ला काही पैसे कमवत जरी नसली तरी तू किती पैसे बचत करते आहेस ……
ऑनलाइल वर्क फ्रॉम होम करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस
तू तर ह्या घरातली बॉस आहेस ..तू आमच्या कडून वर्क फ्रॉम होम करवून घे आणि अशीच आनंदी आणि निरोगी राहा…
तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर articles.contentstudioo.com ला फॉलो करा आणि तुमच्या मित्रा परिवारासोबत शेअर करा . असाच नवनवीन कंटेंट आम्ही रोजच तुमच्यासाठी घेऊन येऊ..
स्वाती बोरसे,
वडोदरा गुजरात